पुणे प्रतिनिधी: पुणे लोकसभा मतदार संघाच काही तासावर मतदान येऊन ठेपल आहे.तर या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके हे चार उमेदवार आहेत.मात्र त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत.त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकार्यांनी कारवाई करावी,या मागणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये जवळपास अडीच तास दोन ठिय्या आंदोलन केले.मात्र यामुळे पोलिस स्टेशन बाहेर भाजप आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहण्यास मिळाले.यामुळे सहकारनगर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सर्व घडामोडी लक्षात घेऊन रवींद्र धंगेकर यांची समजूत काढण्यात पोलिसांना यश आल्याचे पाहण्यास मिळाले.त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र धंगेकर म्हणाले की,सहकारनगर भागात पैशांच वाटप करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नाव पोलिसांना दिली आहेत.त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच आश्वासन दिल्यानंतर, ठिय्या आंदोलन मागे घेत आहे.पुन्हा पैशांच वाटप करणारे कार्यकर्ते आढळून आल्यास,आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसणार आहे.त्याच बरोबर करोना काळात ज्यांची (महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ) ४०० पट संपत्ती वाढली. त्यांचा आजच्या निवडणुकीत तोच पैसा बाहेर आला आहे.त्यामुळे त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करित असल्याच सांगत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर त्यांनी टीका केली.