पुणे : देशात आणि राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : रोहित माझ्या मुलासारखा, त्याच्याबाबत मी असे करूच शकत नाही ; अजित पवार यांची स्पष्टोक्ती

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणारच; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, की देशातील सर्वच महापुरुषांबद्दल सर्वांनीच आदर राखायला हवा. सर्वच महापुरुषांनी निश्चितच देशाच्या भल्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, समाजप्रबोधनासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करून योगदान दिले आहे. समाजातील वातावरण दुषित होईल, असे वक्तव्य कोणीही करू नये. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही बेताल वक्तव्ये तत्कालीन राज्यपाल, राज्य सरकारचे मंत्री, आमदार यांनी केली. त्याचे खंडन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले नाही. मात्र, आता महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे, असा माझा कयास आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savarkar gaurav yatra is to divert attention from inflation and unemployment by rulers says ajit pawar pune print news psg 17 ssb
Show comments