लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पोलीस चारित्र्य पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सुरक्षारक्षक, कामगारांना ५०० रुपयात प्रमाणपत्र तयार करुन दिली जात होती. ५१ बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
गणेश संजय कुंजकर (वय २४, रा. बेघरवस्ती, भुईंज, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गणेश हा दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यात असून खासगी कंपनीत कामाला होता. दरम्यानच्या काळात त्याने कामगार पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरक्षारक्षकांना जास्त मागणी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्याने सुरक्षारक्षक पुरविण्याचे निश्चित केले.
आणखी वाचा-पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
त्यासाठी सुरक्षारक्षकाची पोलीस पडताळणी आवश्यक असल्याचे त्याला समजले. त्याच्याकडे प्रमाणपत्राबाबत विचारणा झाली. त्यामुळे त्याने काही जणांचे मूळ प्रमाणपत्र घेतले. त्यात फेरबदल करत मूळ प्रमाणपत्रावरुन बनावट प्रमाणपत्र करुन काही जणांना दिले. सुरक्षारक्षकांना जास्त प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीतून समोर आले. केवळ ५०० रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र तयार करुन दिले जात होते. आरोपी गणेश याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल फोन, चारित्र्य पडताळणीची ५१ बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.