पुणे : रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील ७७ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.रविवारी दिवसभरात आढळलेल्या ७७ नवीन रुग्णांपैकी ४० रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. २६ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर ११ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवारी आढळलेल्या ७७ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार ६०८ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ५३१ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventy seven new corona patient in pune district pune tmb 01