चिंचवड विधानसभेवरून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चढाओढ लागली आहे. शंकर जगताप हे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दिर आहेत. शंकर जगताप यांनी उघडपणे चिंचवड विधानसभेवर दावा करत इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर देत चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या त्या राजकीय उत्तराधिकारी असल्याचं देखील अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी अधोरेखित केले आहे.

हेही वाचा – पिंपरी : मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या कामाला सुरुवात; कधीपर्यंत धावणार मेट्रो?

हेही वाचा – पिंपरी : समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठा विस्कळीत; काय आहे कारण?

अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, चिंचवड विधानसभेवर भाजपची ताकद आहे. महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटते. पुढे त्या म्हणाले, दिवंगत लक्ष्मण जगताप हे चार वेळेस चिंचवड विधानसभेतून निवडून आलेले आहेत. तिथं आमची ताकद जास्त आहे. दिर, शंकर जगताप यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. बोलण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. विधानसभा लढवण्यावर मी ठाम आहे. पोटनिवडणुकीच्या वेळी कुठलीही चर्चा झाली नाही. उलट, परिवारातील प्रत्येकाने पोटनिवडणुकीत झोकून देऊन ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले. लोकसभेपूर्वीच माझी विधानसभेची तयारी सुरू असून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, असेही त्या म्हणाल्या.