पुणे: महापुरुषांचा इतिहास प्रत्येक शाळेत शिकविण्यात यावा, तरुणांना रोजगार मिळावा,महिला आणि तरुणीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखल्या पाहिजेत आणि आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे,राजकारणातील घराणेशाही बंद व्हावी,या मागणीसाठी शरद पवार  गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या जवळील मेट्रो स्टेशनच्या ट्रॅकवर उभा राहून आंदोलन केले.त्यावेळी एक आंदोलनकर्ता अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न करित होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या आंदोलकांशी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल हे संवाद साधत होते.त्यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांशी वाद झाल्याची घटना घडली.त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि मेट्रो ट्रॅकवरून सर्व आंदोलनकर्त्यांना बाजूला केले. जवळपास एक तासभर मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती.त्यानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group activists protest on metro tracks in pune for many demands including employment for youth svk 88 amy