पुणे : शिवसेना शहर आणि जिल्हा पदाधिकारी क्षमता बांधणी कार्यशाळेचे शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आयोजन करण्यात केले होते.त्या कार्यशाळेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे,तर माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ यांनी उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला. त्या कार्यशाळे दरम्यान योगेश कदम हे मार्गदर्शन करित असताना,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नीलम गोऱ्हे यांना फोन आला.त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत फोनद्वारे संवाद साधताना म्हणाले,आपल्या सर्वांना शुभेच्छा,आजपासून सर्वांनी कामाला लागायाच असून आता भगवा फडकूनच थांबायाच,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हाच वारसा एकनाथ शिंदे हेच चालवत आहे : आनंद अडसूळ

पायात चपल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत.तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हाच वारसा एकनाथ शिंदे हेच चालवत आहे.पैसे वाल्यापेक्षा कर्तृत्वान शिवसैनिकांचा त्यांनी सन्मान केला आहे.त्यामुळे आगामी होणार्‍या निवडणुकांमध्येही हाच न्याय निष्ठावंत शिवसौनिकांना मिळेल,त्यामुळे निवडणुका लक्षात घेऊन इच्छुकांनी आपल्या पक्षाचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

महायुतीच्या विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा : नीलम गोऱ्हे

शिवसेना स्थापनेपासून ज्या ठिकाणी शहर आणि गाव त्या ठिकाणी शिवसेना राहिली आहे. त्यानुसार आपला प्रत्येक शिवसैनिक काम करीत राहिला आहे.यापुढील काळात देखील अधिक जोमानं काम शिवसैनिकांनी करावे,असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी केले.तसेच त्या पुढे म्हणाल्या,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आली आहे.पण या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे.हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.त्यानुसार राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागल पाहिजे,त्या दृष्टीने आता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गट आणि गणनिहाय बांधणी करणे आवश्यक आहे.तसेच युती झाली तर आनंदाच आहे. परंतु युती झाली नाही.तर स्वतंत्र जायला लागल तर पाठीमागे वळून बघण्याची गरज नाही.त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून आपला कस लावता येणार आहे.त्यामुळे सर्वानी मिळून काम करावे,असे आवाहन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.