शिरुर: शिवसेनेसाठी शिरुरचे महत्व अनन्यसधारण असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिरुर मधून शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल यादृष्टीने कार्यकर्त्यानी नियोजन करावे असे आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केले .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरुर येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे , उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद ,  तालुका प्रमुख रामभाउ सासवडे , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोमे , तालुका संपर्क प्रमुख सारिका पवार , उपतालुका प्रमुख शरद नवले ,संतोष वर्पे  , शहर प्रमुख मयूर थोरात आदी उपस्थित होते .

वाघमारे  म्हणाल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात . सर्वसामान्यांसाठी काम करणारे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे. ज्या ज्या वेळीस अडचण, संकटे असतात त्यावेळी मदतीसाठी शिव सैनिकच धाव घेतात .समाजकारणास शिवसैनिक प्राधान्य देतात. शिरुर चे शिवसेनेला अनन्यसाधारण महत्व असून सन  २०२९ ला लोकसभा व विधानसभा  निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल अशी प्रतिज्ञा शिवसैनिकांनी करावी .

शिरुर लोकसभा निवडणूक धनुष्यबाण्यावर लढविली असती तर शिरुर लोकसभेत विजय झाला असता असे सांगून त्या म्हणाल्या की  आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या कुस्तीत शिवसेनेचे  उमेदवार समोरच्या उमेदवारांना  चितपट करतील  .हातात घेतलेल्या भगव्या निष्ठेने शिरुर मध्ये शिवसैनिकांनी फडकवित ठेवला आहे . शिवसैनिकांनी ठणकावून सांगावे  आमच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे. शिवसेनेत सर्व सामान्यांना ताकद व सन्मान देण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात आपणांस  राजकारणाच्या वारसा नसताना प्रदेश प्रक्क्ते म्हणून काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली .

 एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले की ते शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे  व  शिवसेनेचे वारसदार आहे . आपल्या मुलास केंद्रीय मंत्री न करता सर्वसामान्य निष्ठावंत  शिवसैनिक प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद देवून शिंदे यांनी दाखवून दिले की आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याना सन्मान व पद देतो असे वाघमारे म्हणाल्या .शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गीताजली ढोमे  म्हणाल्या  की आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत निवडणुकीत शिरुर तालुक्यात पक्षाला यश मिळेल . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठीचे नियोजन कार्यकर्त्यानी केले आहे .शालेय  विद्यार्थिनीच्या स्वसरंक्षणासाठी जिजाउच्या लेकी हा उपक्रम राबविणार आहे . शिवसेनेचा कणा युवक आहे .सन २०२९ ला शिरुरला शिवसेनेचा आमदार अस नियोजन करण्यात येईल असे त्या म्हणाल्या .

यावेळी प्रास्ताविक तालुका प्रमुख रामभाउ सासवडे यांनी केले . स्वागत शहरप्रमुख मयूर थोरात यांनी केले सूत्रसंचालन व आभार  शहर संघटक सुरेश गाडेकर यांनी मानले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader jyoti waghmare statement regarding the planning of shiv sena candidate to win from shirur amy