पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह ८ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही कारवाई केली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस

महाविकास आघाडीतील घटक पक्ष या नात्याने शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मात्र, चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत होते. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group pimpri anita tutare expelled 8 people pune print news spt 17 ysh