पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती.या आरोपीचा शोध १३ पथकांच्या माध्यमांतून घेतला जात होता,पण अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनाकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन केली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी १३ ठिकाणी पथक रवाना केली होती.तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोधा घेतला जात होता.तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तीना फोन केले होते.

त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती.त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्‍या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील आहे.त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून दिवसभर आरोपीचा शोध घेतला.

आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता.मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायच असल्याच सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला.

मात्र अनेक अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला,अखेर रात्रीच्या सुमारास गुणाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपींला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलिस स्टेशन येत आणण्यात आले आहे.या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी १२  वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी कळवले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swargate rape case pune police arrest accused dattatreya gade pune print news svk 88 amy