पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करत आघाडी घेतल्यानंतर ठाकरे गटाने आता प्रचाराला सुरुवात करण्याचे नियोजन केले. माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे हे रविवारी मावळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे लोणावळ्यात जंगी स्वागत केले जाणार असून, तळेगाव दाभाडे आणि पिंपरीत ‘महान्याय, महानिष्ठा’ सभा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेला मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथून सलग तीनवेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. मावळमधील कार्ला येथील आई एकविरा देवी ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. त्यामुळे मावळवर ठाकरे यांचे विशेष लक्ष असते. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेमधून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित केली. वाघेरे यांनीही मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.

हेही वाचा – पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट संकेतस्थळ, सायबर चोरट्यांकडून ग्राहकांची फसवणूक

आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे रविवारी मावळ दौऱ्यावर येणार आहेत. लोणावळ्यात ठाकरे यांचे शिवसैनिक जोरदार स्वागत करणार आहेत. तर, तळेगाव दाभाडेमध्ये सकाळी अकरा वाजता आणि पिंपरीत दुपारी बारा वाजता जाहीर सभा होणार आहे. ठाकरे हे मावळमधील उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगितले जाते. मावळचा खासदार उद्धव ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक होणार आहे. शिरूरमधूनही महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचा दावाही ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेच्या मराठी शाळा बंद होणार? शिक्षण विभागाचे काय आहे परिपत्रक?

राज्य संघटक एकनाथ पवार म्हणाले की, शिवसेना ज्या पद्धतीने फोडली. जो निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्याचा पर्दाफाश केला जाणार आहे. जनतेच्या दरबारात जाऊन निकालाची चिरफाड केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group goal to win maval what will aditya thackeray say in the meeting tomorrow pune print news ggy 03 ssb