पुणे : स्वारगेट भागात व्यापाऱ्यावर गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने तिघांना बंगळुरूतून अटक केली. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, ३१ काडतुसे, तीन लाख ५२ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभय कुमार सुभोद कुमार सिंग (वय २३, मूळ बिहार), नितीशकुमार रमाकांत सिंग (वय २२, मूळ बिहार) आणि मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख (वय २९, रा. मार्केटयार्ड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंडई भागातील एका तंबाखू व्यापाऱ्यावर स्वारगेट परिसरात गोळीबार करून चार लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्यात आली होती. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी सूरज वाघमोडे (वय २१, रा. भुंडे वस्ती, बावधन) याला अटक केली हाेती.

हेही वाचा – निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर अपघात झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अधिवेशनात सुनील शेळकेंची मागणी

वाघमोडे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांची नावे तपासात निष्पन्न झाली. आरोपी बंगळुरूत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पसार झालेले आरोपी अभयकुमार सिंग आणि नितीशकुमार सिंग यांना बंगळुरूतून अटक केली. मार्केट यार्ड भागातून आरोपी मोहम्मद शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, ३१ काडतुसे आणि रोकड जप्त करण्यात आली.

हेही वाचा – पिंपरीत भाजपाच्या ‘या’ दाव्याने महायुतीत बिघाडी?

पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, संजय जाधव, उज्वल माेकाशी, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, माेहसीन शेख, उत्तम तारु, राहुल राजपुरे, गजानन साेनुने, अमाेल सरडे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The crime branch arrested three people from bangalore in the case of firing on a shopkeeper in swargate area pune print news rbk 25 ssb