पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहण्यास अडचणी आल्यास मदतीसाठी राज्य मंडळाने सहा फोन नंबर जाहीर केले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालाबाबत अडचणी आल्यास मदतीसाठी राज्य मंडळाने सहा फोन नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे. ०२० – २५७०५२०९ , ०२० – २५७०५२०३, ०२० – २५७०५२०४, ०२० – २५७०५२०६, ०२०- २५७०५२०७, ०२० – २५७०५१५१ या क्रमांकांवर संपर्क साधून मदत घेता येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state board has announced a phone number for help if the students face problems in checking their 12th results pune print news ccp 14 amy