पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात येऊन आंबेडकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. देशात मुस्लिम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केले जात आहे. समाजात अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा त्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत

ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी मुस्लिम संघटनांची मुंबई येथे बैठक झाली. मुस्लिम संघटना आठ डिसेंबर रोजी पॅलेस्टाईन या विषयावर सभा घेणार आहेत. मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजप त्याकडे वेगळ्या नजरेने पहात आहे.

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहातून मीच बाहेर काढले. मात्र, त्यांनी त्याबाबत माझे कधी आभार मानले नाहीत. मलाही कोणाची गरज नाही. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर वस्तुस्थिती कळेल. इतिहास पाहिला तर मीच ओबीसीचा जनक असल्याचे दिसेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a high possibility of riots in the state after december 3 statement of prakash ambedkar in pune pune print news apk 13 ssb