लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: नामांकित कंपन्यांचे कपडे स्वस्तात घेण्याचा मोह चंदनगरमधील एका महिलेच्या अंगलट आला. महिलेला स्वस्तात कपडे देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी खोक्यातून चिंध्या पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा कपडे विक्री व्यवसाय आहे. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नामांकित कंपन्याचे कपडे स्वस्तात देण्याचे आमिष चोरट्याने महिलेला दाखविले. बाजारभावापेक्षा कमी किमतीत कपडे मिळत असल्याने महिलेने चोरट्याला ऑनलाइन पद्धतीने तीन लाख रुपये पाठविले.

हेही वाचा… पुण्यात आता ई- वाहने सुसाट! राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

चोरट्याने महिलेला खोक्यातून कपडे पाठविले आहेत, अशी बतावणी केली. महिलेच्या घरी खोके आले. तिने खोके उघडले. तेव्हा खोक्यात कपड्यांऐवजी चिंध्या आढळून आल्या. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves sent rags from the box as a lure to give branded clothes at cheap rates to the woman from pune print news rbk 25 dvr