पुणे : राज्यातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. १०३ सहकारी आणि १०४ खासगी, अशा २०७ साखर कारखान्यांनी यंदा १०७३ लाख टन उसाचे गाळप करून ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा उसाचा गाळप हंगाम संपला आहे. राज्यात १०३ सहकारी आणि १०४ खासगी, अशा २०७ कारखान्यांनी सरासरी दैनंदिन नऊ लाख टन क्षमतेने १०७३.९८ लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.२७ टक्के साखर उताऱ्याने ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी १०५५ लाख टन उसाचे गाळप करून ९.९८ टक्के साखर उताऱ्याने १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

हेही वाचा – बालभारती-पौड रस्त्यावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात वादाची ठिणगी?

साखर विभागनिहाय कोल्हापुरात सर्वाधिक २८ लाख टन, पुण्यात २५ लाख टन, सोलापुरात २० लाख टन आणि नगर विभागात १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक ११.५९ टक्के, पुण्यात १०.५४ टक्के, सोलापुरात ९.४ आणि नगरमध्ये ९.९८ टक्के साखर उतारा मिळाला. कोल्हापूर विभागात ४०, पुण्यात ३१, सोलापुरात ५० आणि नगरमध्ये २७, छत्रपती संभाजीनगरमध्ये २२, नांदेडमध्ये २९, अमरावती आणि नागपूरमध्ये प्रत्येकी चार कारखाने सुरू होते.

हेही वाचा – …तर रद्द होणार आरटीईअंतर्गत प्रवेश! शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

अंदाजापेक्षा जास्त साखर उत्पादन

हंगामाच्या सुरुवातीस राज्यात ९० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. पण, सततच्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात उसाची चांगली वाढ झाली. त्यामुळे साखर उतारा वाढला आणि उत्पादनात वाढ होत गेली. हंगामअखेर आता ११० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अंदाजापेक्षा २० लाख टनांनी जास्त साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year harvest season is over how many tons of sugar produced pune print news dbj 20 ssb