पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग | twenty eight new corona patient in Pune district pune | Loksatta

पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग

सोमवारी दिवसभरात आढळलेल्या २८ नवीन रुग्णांपैकी १३ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत.

पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील २८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोमवारी दिवसभरात आढळलेल्या २८ नवीन रुग्णांपैकी १३ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. आठ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर सात रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी आढळलेल्या २८ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार १०४ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ८२६ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुकसानीबाबत पीडब्ल्यूडीकडून केली जातेय टोलवाटोलवी

संबंधित बातम्या

पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू
राज ठाकरेंनी पुन्हा बोलून दाखवली मतं मिळत नसल्याची खंत? निवेदन घेऊन आलेल्यांना म्हणाले, “आम्ही फक्त…”
‘राज्यपाल हटाव’च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, अजित पवार म्हणाले, “कोश्यारी खासगीत म्हणतात…”
महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अजित पवार म्हणाले, “ओठात एक आणि…”
राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय
Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला होणाऱ्या बायकोच्या घरी घेऊन गेला, व्हिडीओ पाहून पाठकबाई म्हणतात…
पुणे: आम्ही फक्त प्रश्न सोडवायला; राज ठाकरे यांची खंत
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ रजेवर, तर राखी सावंतसह चॅलेंजर्स चालवणार घर, पॉवर मिळताच ड्रामा क्वीनची मनमानी