बारामती:- कठोर परिश्रम व आत्मविश्वास या जोरावर आपण यश मिळवू शकतो त्यासाठी सातत्य ठेवावे लागते असे प्रतिपादन प्रसिद्ध  बॉक्सर व ऑलम्पिक विजेता विजेंदर सिंह यांनी केले. बारामती येथे रविवार (दि.१६ फेब्रुवारी )रोजी शरयु यांच्यावतीने बारामती हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विजेंदर सिंह यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी सहा वाजता उद्योजक श्रीनिवास पवार खासदार सुप्रिया सुळे, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार युवा नेते युगेंद्र पवार,विजेंदर सिंह  यांच्या हस्ते झेंडा दाखवून  मॅरेथॉनचा प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी चोला एम.एस.चे व्हाईस प्रेसिडेंट विवेक चंद्रा जनरल मॅनेजर मन्सूर अली, वस्तू फायनान्सचे संदीप मेनन, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे भागवत कुटे, बजाज अलियान्जचे कार्तिक एस. बारामती रनर्सचे डॉ. पी. एन. देवकाते, एम ई एस चे विश्वस्त राजीव देशपांडे, ज्ञानसागर चे संस्थापक प्रा. सागर आटोळे अँड रोहित काटे, डॉ. वरद देवकाते, आदि मान्यवरां सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे यांनी फनरन मध्ये सहभाग नोंदवून मॅरेथॉन पूर्ण केली.

ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व मैदान प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगा,धावणे आवश्यक असून या  मॅरेथॉनच्या माध्यमातून हाच प्रयत्न असल्याचे शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितले.

विजेते स्पर्धक व वेळ पुढील प्रमाणे –

२१ की. मी. (परदेशी खेळाडू पुरुष) प्रथम – डॅनीयल चरुयोत : वेळ १ तास ०५ मिनिटे, द्वितीय- अब्राहम कीपटो : वेळ १ तास ०९ मिनिटे

तृतीय- शिफीना गोबेना : १ तास ११ मिनिटे

२१ की मी (पुरुष)

प्रथम – प्रधान किरुळकर १ तास ५ मिनिट

 द्वितीय – धीरज जाधव  १ तास ६ मिनिट

तृतीय – लीलाराम बावणे १ तास ७ मिनिट

२१ की.मी. (महिला )

प्रथम- साक्षी जाड्याळ १ तास २६ मी.

द्वितीय-  शिवानी चौरासिया १ तास ३१ मी

तृतीय- ऋतुजा जगताप १ तास ५६ मी.

१० किमी पुरुष प्रथम- सुनील कुमार ३० मी. ३७ सेकंद

द्वितीय- प्रवीण गाढवे ३० मिनिट ४३ सेकंद

तृतीय- सुमंत राजभर ३० मी ५८ सेकंद

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.देश विदेशातील मॅरेथॉन पट्टू यावेळी विक्रमी संख्येने सहभागी झाले होते प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांची वॉकेथॉन वैशिष्ट्यपूर्ण ठरली.सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, व सर्वांनी उत्कृष्ट अयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते,अर्चना इंगळे, व सँडी यांनी केले  आभार अँड अमोल वाबळे यांनी मानले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijender singhs guidance to the athletes organizing the baramati half marathon pune print news snj 31 amy