पिंपरी- चिंचवड: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड, धाराशीव येथील जमिनी पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या रोषाला मंत्र्यांना समोर जावं लागलं आहे. त्यांचं हे वागणं साहजिक आहे. अस मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. ते चाकणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. शेतकऱ्यांचा रोष बघायला मिळाला. असा अनुभव अनेकांना आला. शेतकऱ्यांना रोष येणं साहजिक आहे. शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. पुढे ते म्हणाले, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. अशी मदत शेतकऱ्यांना करायची आहे. त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. असं आमचं नियोजन आहे.

पुढे ते म्हणाले, देहू येथील संत तुकाराम महाराजांचं घर त्यांच्या परिवाराच्या संमतीने चांगल्या पद्धतीने वाडा तयार करणार आहोत. आळंदीत ही साडेचार एकरवर ज्ञानपीठ विद्यालय करण्याचं ठरलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, इंधनाचे आणि सोन्याचे दर हे जागतिक पातळीवर ठरतात. पूर्वी अनेकांना सोन्याचे दागिने आवडत होते. आता काहीजण चांदीचे, हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने करतात. असं अजित पवारांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते चाकण येथे सराफाच्या दुकानाचे उद्घाटन झालं. त्यानंतर अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.