पुणे : उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस पाठविली आहेत. लिंबांच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे लिंबांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांनी लिंबांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू केली आहे. अवकाळी पाऊस, तसेच हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. आठवड्यापूर्वी तेजीत असलेल्या लिंबांच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतवारीनुसार लिंबांच्या एका गोणीला ३०० ते १३०० रुपये दर मिळत आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

हेही वाचा : निवडणुकीत होऊ दे खर्च… कोणाचा खर्च सर्वाधिक, कोणाचा हात आखडता?

घाऊक बाजारात सध्या दररोज दीड ते दोन हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री पाच ते दहा रुपयांना करण्यात येत होती. आवक वाढल्याने लिंबांच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात घट झाली आहे. सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येणारी लिंबे आकाराने लहान आणि हिरवी आहेत. लिंबांची प्रतवारी फारशी चांगली नसल्याने दरही कमी मिळाले आहेत. उन्हाळ्यात आंबट लिंबांना चांगले दर मिळतात.

लिंबांच्या गोणीच्या दरात ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. बाजारात लिंबांची आवक वाढली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिंबे विक्रीस पाठविली आहेत. हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. बाजारात आवक झालेली लिंबे कच्ची आणि रंगाने हिरवी आहेत. कच्च्या लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. १५ किलो लिंबांचे दर प्रतवारीनुसार ३०० ते १३०० रुपयांपर्यंत आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा : मावळमध्ये घटलेल्या मताचा कोणाला फटका? नेमके किती झाले मतदान?

हैदराबाद, चेन्नईहून लिंबांची आवक

राज्यात प्रमुख बाजारात सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकरी लिंबे विक्रीस पाठवितात. सोलापूर, नगरसह हैद्राबाद, चेन्नई परिसरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील बाजारात लिंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविली आहेत. उन्हाळ्यात लिंबांना चांगले दर मिळत असल्याने परराज्यांतील शेतकऱ्यांनी लिंबे विक्रीस पाठविली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the sudden fall in the price of expensive lemons pune print news rbk 25 css