पिंपरी चिंचवड: वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. वडील कर्ज फेडत आहेत तर त्यांना खुश कर असे म्हणत २९ वर्षीय पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास पतीने बळजबरी केली. पती आणि सासऱ्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमचे सर्व कर्ज फेडतो, जमीन ही नावावर करतो फक्त माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे सासऱ्याने सुनेला म्हंटले असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या ३४ वर्षीय पतीवर कर्जाचा डोंगर होता. त्यांच्यावर असलेले ते कर्ज वडील फेडत आहेत तर, तू त्यांना खुश कर, तू त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे पतीने पत्नीला सांगितले. सासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने मारहाण केली आहे. सासऱ्याने देखील सुनेचा विनयभंग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या पतीचे बाहेरील महिलेसोबत प्रेम प्रकरण आहे. तू मला आवडतेस, मी तुमच्या दोघांवरील कर्ज फेडतो त्याचबरोबर जमीन देखील नावावर करतो असे म्हणून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी पती आणि सासऱ्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात २९ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife who refuses to have physical relations with her father in law is beaten by her husband in pimpri chinchwad tmb 01 kjp