मखना रेसिपी मखना हा पोषक तत्वांचा खजिना आहे. प्रथिने, आहारातील फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असे अनेक घटक त्यात आढळतात. माखणामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. म्हणून, आपण सहजपणे आपल्या आहाराचा भाग बनवू शकता. याशिवाय मखनामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे भूक कमी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मखाना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे तो आहारातील एक अतिशय उत्तम पदार्थ मानला जाते. मखाना हा अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. यात प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे अनेक आहार तज्ज्ञ देखील मखाना खाण्याचा सल्ला देतात. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रोत्साहन मिळते.

त्यामुळे मखनाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा . साधारणपणे बहुतेकजण मखाणा तुपात, तेलात किंवा बटरमध्ये तळून मीठ घालून खातात. पण माखणापासून इतरही अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.

मखानापासून बनवा ‘हे’ स्वादिष्ट, पौष्टिक पदार्थ

मखाना चाट

उपवासात तुम्ही मखाना चाटचा आनंद घेऊ शकता. यासाठी आधी बटाटे उकळावा. यानंतर एका वेगळ्या पॅनमध्ये मखणा तळून कुरकुरीत करा. आता उकडलेल्या बटाट्यात भाजलेले शेंगदाणे टाका. यानंतर धणे, मिरची, चाट मसाला आणि लिंबू मिक्स करा, यानंतर शेवटी भाजून कुरकुरीत करुन घेतलेला मखाना घालून नीट मिक्स करा, अशाप्रकारे तयार झाला तुमचा मसालेदार मखना चाट.

मखाना रायता

मखाना नीट तळून घ्या. यानंतर दह्यात भाजलेले जिरे आणि काळे मीठ घाला. हिरवी मिरची आणि कोथिंबीर भुरभुरा आणि चांगले मिसळा. त्यात थोडी पिठीसाखर घाला. शेवटी भाजलेला कुरकुरीत मखाना घालून नीट मिक्स करा. यानंतर कढीपत्ता, मोहरी आणि लाल मिरचीची चांगली फोडणी द्या.

मखाना करी

मखाना तळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र आणि लाल मिरची मसाला घाला. बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या, नंतर लसूण मिरची पेस्ट घाला. यानंतर टोमॅटोची पेस्ट आणि धनेपूड, गरम मसाला पावडर आणि भाजीचा मसाला असे सर्व कोरडे मसाले घाला. बाजूंने तेल जमा होईपर्यंत मसाला चांगला परतून घ्या. नंतर पनीर आणि मखना घालून मिक्स करा. मीठ घालून थोडे पाणी घाला. चविष्ट मखाना करी तयार आहे. आता यावर कोथिंबीरीने सजवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of makhana try 3 tasty and healthy recipes of makhana sjr