रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही. आतापर्यंत तुम्ही कोथिंबीर वडी, अळू वडी खाल्ली असेल पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कांद्याच्या वड्या. मात्र या वड्या तुम्हाला नक्की आवडतील.
कांद्याच्या वड्या साहित्य –
- २ कांदे
- कोथिंबीर १/२ वाटी
- मिरची ४-५
- जीरे १ छोटा चमचा
- ओवा १ छोटा चमचा
- हळद १ छोटा चमचा
- लाल तिखट २ चमचे
- मीठ चवीनुसार
- तांदळाचे पीठ १ वाटी
- बेसन १/२ वाटी
- तळण्यासाठी तेल
कांद्याच्या वड्या कृती –
सर्वप्रथम कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्या. यानंतर या मिश्रणात सर्व मसाले व पीठ, मीठ एकत्र करून गोळा करून घ्या. फ्राय पॅनवर तेल घालून त्या गोळ्याची वडी थापा. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. यानंतर या वड्या सॉससोबत सर्व्ह करा.
हेही वाचा – आंबट, गोड, तिखट चवीचा ‘मेथांबा’ म्हणजे उन्हाळ्यातील पर्वणीच, नक्की ट्राय करा ही रेसिपी
आजच नाष्ट्यासाठी कांद्याच्या वड्या नक्की करुन पाहा. आणि कशी होते रेसिपी हे आम्हाला नक्की कळवा.