Turichya Danyacha Zunka : हिवाळ्यात पौष्टिक तुरीच्या शेंगा येतात. विदर्भात तर तुरीच्या शेंगावर खूप जोर असतो. मग तुरीच्या दाण्याची आमटी, कोणत्याही भाजीमध्ये किंवा मसाले भातमध्ये तुरीचे दाणे आवडीने खाल्ले जाते पण तुम्ही कधी तुरीच्या दाण्याचा झुणका खाल्ला का? ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. चवीला खूप स्वादिष्ट आणि बनवायला खूप सोपी आहे. आज आपण तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवयाचा, हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • हिरवे ताजे तुरीचे दाणे
  • तेल
  • कांद्याची पात
  • कढीपत्ता
  • लसणाच्या पाकळ्या
  • हळद
  • लाल तिखट
  • टोमॅटो
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : Nagpur Tarri Pohe : नागपूरचे तर्री-पोहे! झणझणीत तर्री घातलेले पोहे कसे बनवले जातात, पाहा VIDEO

कृती

  • हिरवे ताजे तुरीचे दाणे घ्या. हे दाणे स्वच्छ धुवून चांगले उकळून घ्या.
  • त्यानंतर उकळलेले दाणे मिक्सरमध्ये बारीक करा.
  • एका कढईत तेल घ्या.
  • त्यात मोहरी, कढीपत्ता कांद्याची पात, लसणाच्या पाकळ्या टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात टोमॅटो बारीक चिरुन त्यात टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात तुरीच्या दाण्याची पेस्ट टाका आणि चांगले परतून घ्या
  • त्यावर झाकण ठेवून कमी आचेवर थोडा वेळ चांगले शिजवून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turichya danyacha zunka recipe how to make turichya danyacha zunka vidarbha style recipe food lovers ndj