Ukadiche Modak : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्व जण उत्सूक आहेत. अशात बाप्पांचे आवडते चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तुम्हीही खूप उत्सूक असाल. गणपतीला सर्वात जास्त मोदक आवडतात. आज आपण गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊ या ही सोपी रेसिपी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- बासमती तांदळाचे पीठ
- नारळ
- गूळ
- खवा
- साखर
- पाणी
- मीठ
- साजूक तूप
हेही वाचा : कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती
- मोदकाच्या सारणासाठी नारळ किसून घ्या आणि भाजून घ्या
- त्यात गूळ, खवा आणि आणि तांदळाचे पीठ टाका
- दोन भांड्यामध्ये उकळत ठेवावे. पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात तूप आणि साखर घालावी.
- नंतर पाणी ढवळून त्यात तांदळाचे पीठ घालावे. झाकण ठेवून वाफ आणावी.
- उकड गरम असतानाच पीठ मळून घ्यावे
- त्यात सारण भरुन मोदकासारखा आकार द्यावा
- असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावे.
- हळदीच्या पानात जर हे मोदक वाफवले तर स्वाद चांगला येतो.
- तुमचे उकडीचे मोदक तयार होईल.
First published on: 12-09-2023 at 14:42 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukadiche modak recipe how to make steamed modak for ganpati ganesh chaturthi special ndj