हेच ते बंडखोर आमदार..

एकनाथ संभाजी शिंदे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे जवळचे सहकारी. 

हेच ते बंडखोर आमदार..

ठाणे आणि पालघर

एकनाथ संभाजी शिंदे

 मतदारसंघ : कोपरी-पाचपखाडी

 किती वेळा निवडून आले : चार वेळा, पक्ष – शिवसेना

 घोषित संपत्ती : जंगम मालमत्ता : ९७ लाख १४ हजार ७१० रुपये तर स्थावर मालमत्ता : ४ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये. दायित्व : तीन कोटी २० लाख ६४ हजार १९५ रुपये. पत्नी लता शिंदे यांच्या नावे जंगम मालमत्ता : १ कोटी १३ लाख ४७ हजार ७५६ रुपये, स्थावर मालमत्ता : ४ कोटी ९८ लाख रुपये. दायित्व : ५३ लाख ९६ हजार ६६ रुपये.

 राजकीय वारसा  : नाही. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे जवळचे सहकारी. 

  गुन्हेगारी पार्श्वभूमी: ईडी वा तत्सम तपास यंत्रणेचा अद्याप ससेमिरा नाही.

प्रताप बाबूराव सरनाईक

 मतदारसंघ : ओवळा-माजिवाडा

 किती वेळा निवडून आले : तीनदा

आधीचा पक्ष :  राष्ट्रवादी आणि आताचा पक्ष – शिवसेना

 घोषित संपत्ती : जंगम मालमत्ता : २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६३ रुपये. स्थावर मालमत्ता १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये. दायित्व : ११० कोटी ९६ लाख ५८ हजार १६८ रुपये. पत्नी परिषा सरनाईक यांच्या नावे जंगम मालमत्ता : ५ कोटी १ लाख ३९ हजार ३८२ रुपये. स्थावर मालमत्ता : १२ कोटी ६६ लाख रुपये. दायित्व : ६ कोटी १२ लाख १७ हजार ६३८ रुपये.

 राजकीय वारसा : नाही.  

 बांधकाम प्रकल्पांमधील गुंतवणूक आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील कामांवरून ईडीने प्रताप सरनाईक यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती.

 गुन्हे : शासकीय कामात अडथळा, धमकी देणे व अपशब्द वापरणे आणि राजकीय गुन्हे

 शांताराम मोरे

 मतदारसंघ :  भिवंडी ग्रामीण

 मालमत्ता : जंगम मालमत्ता १६ लाख ३२ हजार ६९५. पत्नीच्या नावे तीन लाख १५ हजार. स्थावर उत्पन्न ११ लाख ६४ हजार १८३ रुपये.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी:  नाही.

डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर

 मतदारसंघ : अंबरनाथ (अनुसूचित जाती)

  पक्ष :  शिवसेना

 घोषित संपत्ती : २०१८-१९ चे करपात्र उत्पन्न – ५३,४२,१६९,

 जंगम मालमत्ता : २,७७,१६,५७१.

स्थावर मालमत्ता – ६९,७०,३३४ (खरेदी किंमत), २,७९,३०,००० (बाजारमूल्य)

 राजकीय वारसा : नाही

 जानेवारी २०२२ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून डॉ. बालाजी किणीकर यांना समन्स देण्यात आले होते. मात्र त्यांची कोणतीही चौकशी, तपास झाला नाही. चुकीची माहिती देत तक्रार केल्याने समन्स देण्यात आले होते, ते नंतर मागे घेतले गेले, असे स्पष्टीकरण डॉ. किणीकर यांनी त्या वेळी दिले होते.

 विश्वनाथ भोईर

 मतदारसंघ : कल्याण पश्चिम

  पक्ष : शिवसेना

  किती वेळा निवडून आले : प्रथमच 

 मालमत्ता : एकूण मालमत्ता एक कोटी तीन लाख ३५ हजार ९२६. जंगम ३३ लाख ८८ हजार ९२६, स्थावर १९ लाख ४९ हजार ४००. बाजार किंमत ६९ लाख ४७ हजार. पत्नी वैशालीची मालमत्ता १५ लाख ५९ हजार १९३.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, प्राणघातक हत्याराने दुखापत करणे.

राजकीय वारसा: नाही.

श्रीनिवास चिंतामण वनगा

 मतदारसंघ : पालघर

  पक्ष :  शिवसेना.

 घोषित संपत्ती : मालमत्ता : श्रीनिवास वनगा 

जंगम: १.७० लक्ष, स्थावर: ३४.६० लक्ष,एकूण: ३६.३० लक्ष

 राजकीय वारसा : भाजपमधून खासदार वआमदार तसेच जिल्हाध्यक्षपदी राहिलेल्या कै.  चिंतामण वनगा यांचे चिरंजीव.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: नाही

मुंबई आणि कोकण

सदा सरवणकर

 मतदारसंघ : माहीम 

 राजकीय वारसा – पुत्र, माजी नगरसेवक समाधान सरवणकर

 गुंतवणूक मालमत्तेचे मूल्य : १ कोटी २० लाख

पत्नी –  १ कोटी ४३ लाख

 पैकी मुदत ठेवी : ७३.८८ लाख (सदा सरवणकर)  

५३.०३ (पत्नी)

 स्थावर मालमत्ता : ४.५५ कोटी   पत्नी १.८५ कोटी

मंगेश अनंत कुडाळकर

 मतदार संघ : कुर्ला

 घोषित संपत्ती : पत्नी व स्वत:च्या नावे अंदाजे एक कोटींची जंगम मालमत्ता, तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे एकूण ८  एकर जमीन ज्याचे आताचे बाजारमूल्य साडे तीन लाख रुपये इतके आहे. मुंबईत कुर्ला परिसरात एकूण तीन सदनिका. त्यांची आताच्या बाजारभावानुसार अंदाजे किंमत साडे तीन कोटी रुपये.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी:  नाही.

दिलीप भाऊसाहेब लांडे

 मतदार संघ : चांदिवली

  पक्ष :  शिवसेना. .

 घोषित संपत्ती : पत्नी व स्वत:च्या नावे अंदाजे एक कोटींची जंगम मालमत्ता , तर पुणे जिल्ह्यातील भोर जमीन जिचे आताचे बाजारमूल्य दहा लाख रुपये. मुंबईत कुर्ला परिसरात  मिळून चार दुकाने.  त्याची आताच्या बाजारभावानुसार किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे.

 कुर्ला व साकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पुतळा दहन आंदोलन, शासकीय कामात अडथळा, संघटित मारहाण असे गुन्ह्याचे स्वरूप, राजकीय पक्षांतराबाबत आधीच एक खटला  न्यायालयात.

प्रकाश राजाराम सुर्वे

 मतदार संघ : मागाठाणे

 घोषित संपत्ती : पत्नी व स्वत:च्या नावे अडीच कोटींची जंगम मालमत्ता, तर कुंभार्ते माणगाव येथे एकूण ६० एकर जमीन ज्याचे आताचे बाजारमूल्य ९० लाख इतके आहे. मुंबईत बोरिवली व वरळीत मिळून पाच सदनिका असून त्याची आताच्या बाजारभावानुसार किंमत ३० कोटी आहे.  दहिसर पोलीस ठाण्यात कलम ३३६, ४२७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल,  ईडी कारवाई नाही.

भरत गोगावले

 मतदारसंघ : महाड

 संपत्ती : गोगावले यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १५ लाख ८३ हजार रुपयांची जंगम, ८४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ४ लाख रुपयांची जंगम, तर ८४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मुलाच्या नावावर ४६ लाखांची मालमत्ता आहे. दायित्वही मोठय़ा प्रमाणात आहे.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: निरनिराळय़ा कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

महेंद्र थोरवे

 मतदारसंघ : कर्जत खालापूर

 संपत्ती- थोरवे यांच्याकडे  ६८ लाख ६२ हजार जंगम, तर १७ कोटी ९७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ३१ लाख १० हजार रुपयांची जंगम, तर ९२ लाख ६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. थोरवे यांच्यावर १ कोटी ६१ लाख रुपयांचे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ८१ लाख रुपयांचे दायित्व असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: नाही.

यामिनी जाधव

 मतदार संघ : भायखळा 

  पती यशवंत जाधव यांची २०१९-२० मधील संपत्तीचे मूल्य एकूण गुंतवणूक, बँक ठेवी, सोने मूल्य – २.७४ कोटी.  पतीकडील १.७२ कोटी. स्थावर मालमत्तेचे मूल्य – ३.४८ कोटी

राजकीय वारसदार : पुत्र, सिनेट सदस्य निखिल जाधव.

 एकूण कर्जदायित्व :२.६५ कोटी, पती – ४९.९० लाख

  पती मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी  

  अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याची धाड,

   ५५  मालमत्ता जमविल्याचा ठपका.

महेंद्र दळवी

 मतदारसंघ : अलिबाग

 संपत्ती : ५० लाख ५९ हजार रुपयांची जंगम, तर १७ कोटी १२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता. पत्नीची १ कोटी ७७ लाख रुपयांची जंगम, तर १३ कोटी १२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: एका मारहाणीच्या गुन्ह्यात नुकतीच त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 

योगेश रामदास कदम</strong>

 दापोली विधानसभा मतदारसंघ

२०१९ साली विधानसभा निवडणुकीत प्रथमच उमेदवारी मिळवून विजय.

 घोषित संपत्ती  स्थावर : ३० लाख ३४ हजार रुपये (चालू बाजारमूल्य अदमासे – दोन कोटी ३६ लाख ४६ हजार रुपये)

जंगम : ६ कोटी ५१ लाख ४९ हजार रुपये (पत्नीसह कौटुंबिक ९ कोटी ३७ लाख ५३ हजार रुपये)

 राजकीय वारसा : ज्येष्ठ शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: नाही.

दीपक केसरकर

 मतदारसंघ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ २००९ राष्ट्रवादीचे आमदार, २०१४  आणि २०१९ शिवसेना राजकीय वारसा नाही

 घोषित संपत्ती : स्थावर : २० कोटी ११ लाख रुपये,

जंगम : ३९ कोटी २४ लाख रुपये, व्यावसायिक : १६ कोटी ६६ लाख ८४ हजार रुपये,

ठेव : ३८ लाख १२ हजार ७३१ रुपये

 गुन्हेगारी पार्श्वभूमी: नाही

मराठवाडा

प्रदीप जैस्वाल

 मतदारसंघाचे नाव : औरंगाबाद मध्य

 संपत्ती : १२ कोटी ६८ लाख २ हजार १५०

औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून येणे म्हणजे तारेवरची कसरत. हा मतदारसंघ एमआयएमकडे सरकलेला. प्रदीप जैस्वाल यांचा संपर्क मुस्लीम- दलित मतदारांचा संपर्कही चांगला; पण भाषणाची कला नाही की मुद्दे उचलून शिवसेनेची भूमिका मांडणे त्यांना अवघड. तसे शिवसैनिक म्हणून संघटनेत काम करणाऱ्यांना सहकार्य करणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख. हाणामाऱ्या झाल्याच तर वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, असा विश्वास देत मते मिळविण्यात त्यांना यश आले. तसे सेनेतील कुरबुरीतही ते फारसे लक्ष घालत नव्हते. शिवसेना नेत्यांमधील कुरघोडय़ात कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अशी भूमिका असणारे प्रदीप जैस्वाल बंडात सहभागी झाल्याने त्यांच्या मतदारसंघातून अजून कोणतीही मोठी प्रतिक्रिया उमटलेली नाही; पण कोणतेही राजकीय भाष्य फारसे भडकपणे व्यक्त न करणाऱ्या जैस्वाल यांचे बंड अनाकलनीय असल्याचे शिवसैनिक सांगतात.

ज्ञानराज चौगुले

 मतदारसंघ : उमरगा

 संपत्ती : २०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची व त्यांच्या पत्नीची स्थावर व जंगम मालमत्ता एक कोटी ५६ लाख रुपये  गरिबीत वाढलेले आणि दोन वेळा नगरसेवक राहिलेले ज्ञानराज चौगुले २००९ मध्ये आरक्षित मतदारसंघातून निवडून आले. आता ते राजकारणात तरबेज झाले आहेत. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचीही अपेक्षा होती. तसे त्यांनी प्रयत्नही करून पाहिले. उमरगा मतदारसंघ लिंगायत व मराठा असा पगडा असणारा. तिथे काँग्रेस- शिवसेनेत नेहमीची लढत होत. त्यात आरक्षणामुळे संधी मिळाल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची सावली बनून वावरणे असे काम त्यांनी पहिले काही वर्षे केले. सत्तेच्या पटलावरचा चौगुले यांचा वावर वाढला. पण तालुक्याच्या राजकारणावर स्वत:ची अशी छाप निर्माण करता आली नाही. जिल्ह्य़ात शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी कधी खास प्रयत्नही केले नाहीत. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर होईल तेवढा निधी सत्ताधारी मंत्र्यांकडून मिळविण्यासाठी ते प्रयत्न करायचे. मग सत्ता काँग्रेस असो की भाजपची. निधी आणि पद या दोन्हीच्या लालसेने ते आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

बालाजी कल्याणकर

 मतदारसंघ : नांदेड उत्तर

 संपत्ती : ९१ लाख ४९ हजार ५९३

 नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे बडे नेते डी. पी. सावंत यांना पराभूत करून बालाजी कल्याणकर निवडून आले. या मतदारसंघातून कोणालाही उमेदवारी द्या, पण तो शिवसैनिक असला पाहिले असा हट्ट २०१९ मध्ये धरला गेला. या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार तगडा होता. मुस्लीमबहुल मतदारसंघात अनेकांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसची मते विभागली गेली आणि सावंत यांचा पराभव झाला. आमदार आणि नगरसेवक अशी जबाबदारी स्वीकारणारे बालाजी कल्याणकर यांचा मतदारसंघातील लढा काँग्रेसशी होता आणि आहे. कल्याणकर हे नांदेड शहरातील एकमेव शिवसेनेचे आमदार. आता ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसा मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. बंडात सहभागी असतानाही परत येण्याच्या तयारीत ते होते,  असा उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचा दावा कल्याणकर यांचे व्यक्तिमत्त्व कसे लवचिक आहे, हे सांगण्यास पुरेसा असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत.

संजय शिरसाट

 मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम

 संपत्ती : तीन कोटी ४१ लाख २९ हजार

२०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची व त्यांच्या पत्नीची स्थावर व जंगम मालमत्ता  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडून आलेल्या आमदारांना वेळ देत नाहीत अशी तक्रार करून काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर राहण्यात नुकसान आहे, असे जाहीरपणे मांडणाऱ्या संजय शिरसाट यांना निवडणुकीत त्रास मात्र भाजप उमेदवारानेच दिला. ब्राह्मण मतदारांचा प्रभाव असणाऱ्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी या वेळी विजय मिळवला खरा, पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपमधील नवख्या उमेदवाराने त्यांना घाम फोडला होता. सतत भाजप उमेदवाराच्या भीतीत राहण्यापेक्षा आपणच भाजपमध्ये जावे आणि आरक्षित मतदारसंघातून आपली जागा निश्चित करावी असा त्यांचा बंडात सहभागी होण्यामागचा होरा आहे. रिक्षा चालविणारी व्यक्ती ते तीन वेळा आमदार अशी राजकीय वाटचाल असणाऱ्या शिरसाट यांना भाजपचीच भीती आहे. त्या भीतीचा सामना करण्याऐवजी शिवसेनेनेच भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करावे अशी भूमिका ते व्यक्त करीत आहेत. त्यांचे बंडात सहभागी होणे हे मतदारसंघाच्या रचनेत दडलेले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून होणाऱ्या निधी वितरणातही दडले आहे. त्यांच्या मतदारसंघातील कामांना निधी दिल्यावर एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचा खास दौरा केला होता.

तानाजी सावंत

 मतदारसंघाचे नाव : परंडा

 संपत्ती : १४७ कोटी ६६ लाख ४३ हजार ८८७

२०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची व त्यांच्या पत्नीची स्थावर व जंगम मालमत्ता  शिवसेनेतील साखर कारखानदार नेता. पुण्यासारख्या मोठय़ा शहरात त्यांच्या शैक्षणिक संस्था. त्यामुळे वागण्या, बोलण्यातील बेदरकारपणा शिवसैनिकांनी व पक्षातील वरिष्ठांनी सहन करावा अशा मानसिकतेतून अनेक वादग्रस्त वक्तव्ये करणारे व्यक्तिमत्त्व अशी तानाजी सावंत यांची ओळख. कुरघोडीच्या राजकारणातून जलयुक्त शिवार योजनेला पर्याय म्हणून शिवजलक्रांती योजना आखणारे तानाजी सावंत खरे तर मंत्री होते. पण या वेळी त्यांना बाजूला करण्यात आले आणि ते थेट शिवसेना पक्षप्रमुखांवरही चिडले. निवडणूक निकालानंतर त्यांनी ‘ मातोश्री’वरही थयथयाट केल्याची आठवण शिवसैनिक सांगतात. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आपले ऐकायलाच हवे अशी व्यूहरचना करून ते जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालत. आर्थिकदृष्टया सक्षम असणारा नेता म्हणून अनेकदा त्यांचे म्हणणे खरे मानून राजकारण पुढे सरकते. पण जुने सारे उट्टे काढण्यासाठी ते बंडात सहभागी झाल्याचे उद्धव ठाकरे यांचे समर्थक सांगतात. अलीकडे त्यांचे भाजप नेत्यांशी संबंधही चांगलेच सुधारले होते.

अब्दुल सत्तार

 मतदारसंघ : सिल्लोड

 संपत्ती : पाच कोटी २५ लाख ५४ हजार ३९१  स्वत: व पत्नीच्या नावे असणारी स्थावर व जंगम.

 पाच वेळा निवडून आलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांची मतदारसंघावर कमालीची पकड. त्यामुळे ज्या पक्षात जाऊ तेथे हवे तसे वागू अशी अब्दुल सत्तार यांची वृत्ती. काँग्रेसमध्ये मंत्री असताना कार्यकर्त्यांला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने पद गमावल्यानंतर पुन्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पक्षातील सर्वोच्च नेतृत्वाची स्तुती करायची आणि त्याच पक्षातील ज्येष्ठांनाही वाट्टेल त्या भाषेत सुनावायचे ही कामाची शैली. काँग्रेस आणि नंतर भाजपच्या प्रचाररथावर बसून शिवसेनेचे उमेदवार, त्यानंतर आमदार व राज्यमंत्री झालेल्या सत्तार यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या चुकांमुळे त्यांना उच्च न्यायालयाने फटकारले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी असणारे मैत्रसंबंध आणि भाजपची जवळीक व्हावी, त्यातून सत्तेत अधिक मोठय़ा पदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा असणारे सत्तार आता पुन्हा नव्या बंडात सहभागी झाले आहेत.

संदीपान भुमरे

 मतदारसंघ : पैठण

 मतदारसंघावर पकड. त्यामुळे विधानसभेत पाच वेळा निवडून गेलेल्या संदीपान भुमरे यांचा प्रशासकीय वकुब मात्र जेमतेमच. त्यामुळे कॅबिनेटमंत्री असतानाही बैठकांमध्ये तसे शब्दही न बोलणारे भुमरे मतदारसंघात निधी मिळविण्यात पुढे होते. संत ज्ञानेश्वर उद्यानाची पुनर्रचना, संतपीठ अशा योजना पदरी पडल्या. फलोत्पादन, रोहयोमध्ये अनेक कामे मंजूर करण्याचे अधिकार असतानाही मतदारसंघाबाहेर बघण्याची वृत्ती व क्षमता नसल्याने संदीपान भुमरे तसे दुर्लक्षितच राहिले, ते त्यांच्या ग्रामीण भाषेमुळे. भाजप नेत्यांशी जवळीक हेही त्यांचे वैशिष्टय़. त्यामुळे बंडात सहभागी होऊन त्यांना काय मिळणार आहे हा प्रश्नच आहे.

उत्तर महाराष्ट्र

दादा भुसे

 मतदारसंघ : मालेगाव बाह्य, नाशिक

विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत भुसे हे चार वेळा निवडून आले आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख असताना २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत अपक्ष म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले. आमदारकी मिळाल्यानंतर ते पुन्हा सेनेत दाखल झाले. त्यानंतरच्या तीनही निवडणुकांत ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. घोषित संपत्ती : शेतकरी असणाऱ्या दादा भुसे यांनी तीन वर्षांपूर्वी ११ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा भुसे कुटुंबाकडे २२० ग्रॅम सोने होते. त्यांच्यावर ७२ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे.

 राजकीय पार्श्वभूमी : नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी – भुसे यांच्याविरुद्ध दुखापत पोहोचविणे, धमकावणी, राग येईल असे वर्तन या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ईडी वा तत्सम केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा अद्याप  त्यांच्यामागे  नाही.

सुहास कांदे

 मतदारसंघ :नांदगाव, नाशिक

कांदे हे प्रथमच आमदार झाले आहेत. ते शिवसेनेचे बाहुबली आमदार म्हणून ओळखले जातात.  घोषित संपत्ती : विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे ११ कोटी १४ लाख ३८ हजार रुपयांची संपत्ती होती. त्यांच्यावर एक कोटी दोन लाखांचे कर्ज असल्याची नोंद आहे.

 राजकीय वारसा : नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : घरात शिरून धमकावणे, जिवे मारण्याची धमकी, फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे, कट रचणे, गाळा बळकावण्यासाठी दमदाटी आदी कलमांन्वये दाखल गुन्ह्यांतील सात खटले प्रलंबित. १३ वर्षांपूर्वी नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास ३० ते ३५ दुचाकींची जाळपोळ झाली होती. त्या प्रकरणात कांदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यातून त्यांची मुक्तता झाली आहे. ईडी वा तत्सम केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा अद्याप  त्यांच्यामागे  नाही.

गुलाब पाटील

 मतदारसंघ : जळगाव ग्रामीण

पाटील हे चौथ्यांदा निवडून आले आहेत. चारही वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले.

 घोषित संपत्ती : पाच कोटी ३९ लाखांची संपत्ती असणाऱ्या पाटील यांच्यावर ८० लाखांचे कर्ज आहे.

 राजकीय वारसा : नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी  : पाटील यांच्यावर फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे आदी कलमांन्वये दाखल गुन्ह्यातील एक खटला प्रलंबित आहे.

लताबाई सोनवणे

 मतदारसंघ : चोपडा, जळगाव

सोनवणे या प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाल्या आहेत.

 घोषित संपत्ती : संपत्ती १८ कोटी ५२ लाखांहून अधिक आहे.

 राजकीय वारसा :  लताबाई यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे हे माजी आमदार आहेत.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी :  नाही.

किशोर पाटील

 मतदारसंघ : पाचोरा-भडगाव, जळगाव

सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

 घोषित संपत्ती : सुमारे १३ कोटींची संपत्ती असणाऱ्या पाटील यांच्यावर १० कोटींचे कर्ज आहे.

राजकीय वारसा: काका आर. ओ. तात्या पाटील हे माजी आमदार आहेत.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : पाटील यांच्यावर बनावट दस्ताचा फसवणुकीसाठी वापर, शांतता भंग करणे, अनधिकृतपणे प्रवेश करणे आदी कलमांन्वये तीन गुन्हे दाखल आहेत.

मंजुळा गावित

 मतदारसंघ : साक्री, धुळे

गावित या आधी भाजपमध्ये होत्या. अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर त्या शिवसेनेत दाखल झाल्या.

 घोषित संपत्ती : गावित यांची सुमारे साडेचार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर ४० लाखांहून अधिकचे कर्ज आहे.

राजकीय वारसा:   नाही.

गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

चिमणराव पाटील

 मतदारसंघ : एरंडोल, जळगाव

पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून आले. २००९ आणि २०१९ मधील निवडणूक त्यांनी सेनेच्या तिकिटावर लढली होती.

 घोषित संपत्ती : सुमारे अडीच कोटी

 राजकीय वारसा :नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

चंद्रकांत पाटील

 मतदारसंघ : मुक्ताईनगर, जळगाव

आधीचा पक्ष – पाटील हे २०१९ च्या निवडणुकीत: प्रथमच अपक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते.

 घोषित संपत्ती : सव्वा दोन कोटींहून अधिक

राजकीय वारसा : नाही.

गुन्हेगारी पार्श्वभूमी :  नाही.

पश्चिम महाराष्ट्र

शंभुराज देसाई

 मतदारसंघ : पाटण (जि. सातारा)

 आजवरचे विजय : शिवसेनेतर्फे २००४, २०१४, २०१९ असे तीन वेळा विजय

 घोषित संपत्ती : १४ कोटी ४० लाख २९,३०४ रुपये.

 राजकीय वारसा : आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई हे स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि राज्य मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ कॅबिनेटमंत्री. तर वडील शिवाजीराव देसाई हे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष होते. स्वत: शंभुराज देसाई हे युती सरकारच्या काळात महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच देसाई कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी :  नाही.

प्रकाश आबिटकर

 मतदारसंघ : राधानगरी- भुदरगड मतदारसंघ (जि. कोल्हापूर)

दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेत प्रतिनिधित्व.

 घोषित संपत्ती : १ कोटी ४७ लाख रुपये

 राजकीय वारसा: भाऊ अर्जुन आबिटकर हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. तर वडील आनंदराव आबिटकर हे शेकापचे जुने कार्यकर्ते.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

अनिल बाबर

 मतदारसंघ : खानापूर-आटपाडी (ता. सांगली)

 आजवरचे विजय : १९९०, १९९९, २०१४, २०१९ असा चार वेळा विजय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना 

 घोषित संपत्ती : ३ कोटी ७७ लाख ७६ हजार ५०८ रुपये.

 राजकीय वारसा : नाही. 

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

महेश शिंदे

 मतदारसंघ : कोरेगाव (जि. सातारा)

 २०१९ मध्ये शिवसेनेकडून प्रथमच विजयी

 घोषित संपत्ती : २२ कोटी ४ लाख १७,६२५ रुपये.

 पार्श्वभूमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते म्हणून राजकीय वाटचालीस सुरुवात. जिल्हा परिषद सदस्य होते. नंतर भाजपमध्ये प्रवेश. कोरेगाव मतदारसंघाची बांधणी. जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने शिवसेनेकडून निवडणूक लढवली, त्यात विजयी.

 राजकीय वारसा : नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

राजेंद्र पाटील-यड्रावकर

 मतदारसंघ : शिरोळ मतदारसंघ (जि. कोल्हापूर)

 आजवरचे विजय : विधानसभेत प्रथमच अपक्ष म्हणून विजय. विजयानंतर शिवसेना सहयोगी सदस्य. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

 घोषित संपत्ती : ८ कोटी २० लाख रुपये

 राजकीय वारसा : वडील शामराव पाटील-यड्रावकर हे आमदार रत्नाप्पा कुंभार यांचे सहकारी. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षासोबतचा त्यांचा राजकीय प्रवास. कोल्हापूर जिल्हा सूत गिरणीचे अध्यक्ष होते. शरद सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा या जयसिंगपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तर भाऊ संजय पाटील-यड्रावकर हे माजी उपनगराध्यक्ष आहेत.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

अ‍ॅड. शहाजीबापू पाटील

 मतदारसंघ : सांगोला मतदारसंघ (जि. सोलापूर)

 आजवरचे विजय : १९९५ (काँग्रेस) आणि २०१९ (शिवसेना) असे दोन विजय

 घोषित संपत्ती : एक कोटी ३७ लाख ७७ हजार ३६८ रूपये

 राजकीय वारसा :  नाही. 

 गुन्हेगारी पार्श्वभूमी – नाही.

विदर्भ

संजय राठोड

 मतदारसंघ – दिग्रस जि. यवतमाळ (शिवसेना)

 किती वेळा निवडून आले : २००४ मध्ये पहिल्यांदा दारव्हा विधानसभा मतदारसंघातून, त्यांनतर २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही निवडणुकीत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विजय.

 घोषित संपत्ती :  सहा कोटी २८ लाख ८७ हजार ४९७ रुपये.

 राजकीय वारसा :  नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : २०२१ मध्ये एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात विविध आरोप, पण कुठेही तक्रार वा गुन्हा दाखल नाही.

डॉ. संजय रायमुलकर

 मतदारसंघ :   मेहकर विधानसभा, जि.बुलढाणा

 किती वेळा निवडून आले :  सलग तीन वेळा

 घोषित संपत्ती : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रानुसार, एकूण संपत्ती १,०५,९०,९०३ रुपये, पत्नीच्या नावावर एकूण संपत्ती २५,४०,००० रुपये.

 राजकीय वारसा :  नाही.

 गुन्हेगारी पार्श्वभूमी : नाही.

संजय गायकवाड 

 मतदारसंघ : बुलडाणा विधानसभा, जि.बुलडाणा

 किती वेळा निवडून आले : पहिल्यांदाच

 घोषित संपत्ती :  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रानुसार एकूण संपत्ती १,६१,८५,४४० रुपये, पत्नीच्या नावावर संपत्ती १,१९,५०० रुपये.

 राजकीय वारसा :  नाही

 गुन्हेगारी पार्श्वभूमी :  मारहाण करणे, दंगल पेटवणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे आदींसह विविध गुन्हे दाखल आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rebellious mla eknath sambhaji shinde constituency politics ysh

Next Story
चाँदनी चौकातून: चर्चा अटकेची!
फोटो गॅलरी