चांद्रयान ३ (Chandrayaan-3) कडून पुढच्या अपडेटच्या प्रतिक्षेत इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ आहेत. चंद्रावर आता सूर्योदय झाला असून दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या भागात पुरेशा सूर्यप्रकाश आहे. तेव्हा विक्रम लँडर (Vikram lander) आणि प्रज्ञान रोव्हर ( Pragyan rover )यांच्याकडून काही संदेश येतात का, पृथ्वीवरुन पाठवलेल्या संदेशांना ते प्रतिसाद देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे अलगदपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले. त्यानंतर प्राथमिक उपकरणांची चाचणी झाल्यावर काही तासातच प्रज्ञान रोव्हर हा विक्रम लँडरमधून बाहेर पडला आणि त्याचे चांद्र भूमिवर संचार करायला सुरुवात केली. सुमारे १०० मीटर अंतर कापतांना प्रज्ञानने विविध वैज्ञानिक माहिती आणि छायाचित्रे ही लँडरद्वारे पृथ्वीवर पाठवली. तर लँडरने काही सेकंद इंजिन सुरु करत पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले. विक्रम लँडरनेही विविध वैज्ञानिक माहिती पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाकडे पाठवली. थोडक्यात चांद्रयान ३ ची जी जी उद्दीष्ट्ये होती ती पूर्ण झाली.

हेही वाचा… Maharashtra News Live : “पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्यावर कारवाई झाली”, बच्चू कडूंचा नेमका रोख कोणाकडे?

असं असतांना ३ सप्टेंबरला चंद्रावर सूर्यास्त झाला आणि १४ दिवसांची रात्र सुरु झाली. तेव्हा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला ‘स्लीप मोड’वर टाकण्यात आले. २२ सप्टेंबरला चंद्रावर पुन्हा सूर्योदय झाला. तेव्हा गेले तीन दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागे करण्याचे प्रयत्न इस्रोकडून सुरु आहेत. मात्र आत्तापर्यंत कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून आलेला नाही.

हेही वाचा… विश्लेषण : भारतीय वायू दलात दाखल झालेल्या नव्या ‘सी – २९५’ मालवाहू विमानाचे महत्व काय?

चंद्रावर वातावरण नसल्याने सूर्याचे भार कण हे मोठ्या प्रमाणात थेट चंद्राच्या पृष्ठभागावर आदळत असतात. या भार कणांपासून बचाव व्हावा यासाठी आवश्यक सुरक्षित आवरणे ही चांद्रयान ३ वर आहेत. असं असलं तरी या कणांपासून तसंच २०० अंश सेल्सियसपर्यंत तापमानात टिकून रहाण्याचे आव्हान चांद्रयान ३ पुढे आहे.

चीनचा Chang’e4 लँडर आणि Yutu2 रोव्हर हे जानेवारी २०१९ ला चंद्रावर उतरले होते आणि ते अजुनही कार्यरत आहेत. मात्र आता दोन दिवसांनंतरही संपर्क होत नसल्याने ही मोहिम संपली आहे की काय, चांद्रयान ३ मोहिमेला पूर्णविराम मिळाला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. संपर्क साधण्याचे काम सुरु असल्याचं इस्रोने स्प्ष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The end of chandrayaan 3 mission three days after sunrise on the moon no response yet from vikram lander and pragyan rover asj