ठाणे – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (२१ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात १७३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी ४ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना काळात विद्यार्थी ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते त्याच शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र आता दोन वर्षांच्या कालावधीनंतर बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. उद्या, मंगळवारी (२१ फेब्रुवारी) बारावीचा पहिला पेपर होणार असून, २१ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा सुरू राहणार आहे.

हेही वाचा – कल्याण : यंत्रयुगात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन कट्टे महत्वाचे, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन

कॉपीमुक्त परीक्षेसाठी चार भरारी पथके तैनात

करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानंतर यंदा प्रथमच पूर्वीप्रमाणे नियमित परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ४ भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश असून, महिला विशेष पथकाचा समावेश असणार आहे.

हेही वाचा – पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारी टोळी अटकेत

इयत्ता – बारावी

परीक्षा कालावधी – २१ फेब्रुवारी ते २१ मार्च
परीक्षाकेंद्रे – १७३
परीक्षार्थी संख्या – एक लाख ४ हजार ५६१

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 th exam will start from tomorrow in thane 1 lakh 4 thousand 561 students will appear for exam ssb