ठाणे : भिवंडी येथील खारबाव भागात एका १६ वर्षीय मुलीवर सात जणांकडून सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. खारबाव भागात पिडीत मुलगी राहते.
हेही वाचा >>> पडघा गोळीबार प्रकरण उघडकीस; कर्ज फेडण्यासाठी पोलिसाकडून चोरीच्या उद्देशाने गोळीबार
२ ऑक्टोबरला तिच्या एका मित्राने तिला येथील एका पडीक घरात बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. काहीवेळाने त्या तरुणाने त्याच्या आणखी सहा मित्रांना त्याठिकाणी बोलावले. या सर्वांनी तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केला. रविवारी रात्री पिडीत मुलीने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.