ठाणे : भिवंडीतील माणकोली भागात बुधवारी लाकडी वस्तू बनविणाऱ्या दोन कामगारांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादातून विधीसंघर्ष अल्पवयीन कामगाराने धारदार शस्त्राने आपल्या २२ वर्षीय सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कैसर अजगर अली (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कैसर आणि त्याचा अल्पवयीन सहकारी माणकोली भागातील सुरई गावात लाकडी वस्तू बनविण्याचे काम करत होते. या कामा दरम्यान, काही अज्ञात कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला.
या वादातून विधीसंघर्ष अल्पवयीन सहकाऱ्याने त्याच्या सोबत काम करणाऱ्या २२ वर्षीय कामगाराची मानेवर कटर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठविले आहे.