Premium

डोंबिवली : कॉम्रेड विजयानंद हडकर यांचे निधन

डाव्या चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी काॅम्रेड विजयानंद हडकर यांचे बुधवारी निधन झाले.

Vijayanand Hadkar passed away
डोंबिवली : कॉम्रेड विजयानंद हडकर यांचे निधन (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

डोंबिवली – येथील डाव्या चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी काॅम्रेड विजयानंद हडकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिवसेनेच्या कंटेनर शाखांवर अदानी समूहाची दुसऱ्यांदा कारवाई

हेही वाचा – ठाणे : वागळे इस्टेट परिसराची जलचिंता मिटणार, एमआयडीसीच्या जागेत दोन जलकुंभाची उभारणी

१९६१ मध्ये गोवा मुक्ती आंदोलनात ते विद्यार्थी दशेत सहभागी झाले होेते. भारतीय कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय होते. कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाशन विभागात, सोविएत मासिकात ते अनेक वर्षे काम करत होते. मुद्रित शोधक म्हणून त्यांची ओळख होती. रिक्षा चालक म्हणून त्यांनी डोंबिवलीत काम केले. लाल बावटा रिक्षा संघटनेची त्यांनी स्थापना केली. जनजागृतीच्या अनेक संघटनांमध्ये ते सहभागी होते. ठाणे जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील ते एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comrade vijayanand hadkar passed away ssb

First published on: 30-11-2023 at 19:01 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा