Dahi Handi 2022 Celebration: गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातुन आणखी कोण बाहेर पडणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुणाताई यांनी ही बाब मला बोलून दाखवली होती –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच, यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. “दहीहंडी आणि नवरात्रोउत्सवाच्या माध्यमातून आनंद दिघे यांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम केले असून तेच काम आजही सुरू आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांची बहीण अरुणाताई यांनी ही बाब मला बोलून दाखवली होती. दिघे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित राहलो, हे माझे भाग्य समजतो.”, असेही त्यांनी सांगितले.

Dahi Handi 2022 : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू४३

…पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल –

तसेच, “गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल, असेही ते म्हणाले. हे सर्वसामान्याचे सरकार आहे. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे उत्सव काळजी घेऊन साजरे करा. गणेशोत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण आहे.” असेही त्यांनी म्हटले.

श्रद्धा कपूरची हजेरी –

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावले असून त्याचा मला अभिमान आहे.” तिने सांगितले

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2022 one and a half months ago we broke the biggest handi chief minister eknath shindes statement msr