ठाणे – करोनामुळे खंडित पडलेले जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे यंदा शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी आणि पशुपालक यांना पशुपालन उद्योग, शेती व्यवसायाकरिता प्रोत्साहित करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येते. यंदा हे प्रदर्शन भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे सकाळी ९ वाजल्यापासून भरणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडेल. तर, प्रदर्शनाला प्रमुख पाहूणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित असणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी आणि पशुपालकांना विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करता येतात, याची माहिती जिल्ह्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपक्षी प्रदर्शन राबविले जात होते. परंतू, करोनाकाळात या प्रदर्शनात खंड पडला होता. त्यानंतर, यंदा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हापरिषदे मार्फत देण्यात आली. शेतकरी आणि पशुपालकांचे जीवनमान उंचवावे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी त्याकरिता हे प्रदर्शन राबविण्यात येत आहे.या प्रदर्शनात पशुधनांचे ६० स्टॉल, १५ इतर स्टॉल असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनात जातनिहाय १०० पशुधन, ६० पक्षी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनाच्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्याने शौचालय (मोबाईल शौचालय), अग्निशामक पथक, आरोग्य विभागामार्फत आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागामार्फत सफाई कामगारांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील पशुपालकांनी जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रादेशिक सहायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दौलत दरोडा, आमदार संजय केळकर, आमदार उत्तमचंद आयलानी, आमदार महेश चौगुले, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार किसन कथोरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार रईस शेख, आमदार सुलभा गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत प्रदर्शन संपन्न होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District level livestock exhibition from february 21 in thane zws