Thane news, shivsena news : ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमी वरती सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली केले असून यामध्ये पक्ष पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सल्ला देत इशाराही दिला आहे. “पक्षासाठी झोकून देऊन काम करा” असे आवाहन करत “पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही” असा इशारा दिला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली केले असून यातूनच पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील आनंदाश्रम येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आज झालेल्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी
मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे. सत्ता हातात आहे, अधिकार हातात आहेत. मात्र कधीही याचा दुरुपयोग केलेला नाही. आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला, ते पूर्वी शिवसेनेच्या विरोधात काम करत होते. तरीसुद्धा मी कधीही त्यांच्यावर राग धरला नाही. राजकारणाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी असावी लागते,” असेही त्यांनी म्हटले.
वशिलेबाजीला स्थान नाही
जो पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करतो, तोच पुढे जातो. आमच्या पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही. पक्ष वाढला की तुमचा मान-सन्मान आपोआप वाढतो. म्हणून पक्षासाठी झोकून देऊन काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही, असा इशारा त्यांनी दिला.