लोकमान्यनगर भागात रविवारी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक तसेच दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. तसे जगदाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले असून लोकमान्यनगर भागात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाकुर्लीजवळ हैदराबाद एक्स्प्रेसच्या डब्याला आग

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना बाळासाहेबांची शिवसेनेत गळा लावल्याची चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जगदाळे यांनी नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा आता खरी ठरली आहे.

हेही वाचा >>>त्या वणवा प्रतिबंध तंत्राला वनश्री पुरस्कार; सगुणा वनसंवर्धन तंत्राचा गौरव, पालकमत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

जगदाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर सहकारी माजी नगरसेवक राधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे यांच्यासह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आणि दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण या सुद्धा बाळासाहेबांची शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकमान्य, शास्त्री नगर भागाचा विकास करण्यासाठी हा पक्षप्रवेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुणावरही नाराज नाही. पक्ष सोडत असताना मी कोणाला दोष देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four former ncp corporators will join balasaheb shiv sena in thane amy