ठाणे : जिल्ह्यातील भूजल पातळी सातत्याने घटत असून, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये केवळ ०.२५ मीटर इतकीच वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कृषी विभागामार्फत प्राप्त पर्जन्यमानाच्या आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार ही स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मानले जात आहे. सप्टेंबर २०२५ अखेर ठाणे जिल्ह्यामध्ये झालेल्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत भूमिगत जलसाठ्यात फारसा सुधार दिसून आलेला नाही. ठाणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील सरासरी भूजल पातळी मागील वर्षांच्या तुलनेत फारशी वाढलेली नाही. २०२१ ते २०२५ या कालावधीत जिल्ह्याची भूजल पातळी ०.४३ मीटर वरून अवघी ०.६८ मीटरपर्यंतच पोहोचली आहे. पाच वर्षांत केवळ ०.२५ मीटर वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपायोजना राबविण्या सुरुवात केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. २०२२-२३ मध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला होता. यानुसार भूजल पातळीवाढविण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहे. मात्र जिल्ह्याची भूजल पातळीतील वाढ ही अत्यंत संथगतीने होत आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या काही वर्षांपासून चिंताजनकरीत्या घटत चालली असून, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या पातळीत केवळ ०.२५ मीटर इतकीच वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातुन माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२५ अखेर ठाणे जिल्ह्यामध्ये झालेल्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत भूमिगत जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पर्जन्यमान समाधानकारक असले तरीही भूजल पुनर्भरण दर कमी असल्याने विहिरी, बोअरवेल आणि झऱ्यांमधील पाणी पातळीत फारसा फरक जाणवलेला नाही.

२०२१ साली ठाणे जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ०.४३ मीटर इतकी नोंदवली गेली होती. मात्र २०२५ पर्यंत ती केवळ ०.६८ मीटरपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत अवघ्या ०.२५ मीटर इतकीचरासरीकरण करून वार्षिक भूजल पातळी निश्चित केली जाते. ही पातळी जर सतत घटत असेल, तर तेथील जलसाठा कमी होत असल्याचे द्योतक मानले जाते. ठाणे जिल्ह्यात शहरीकरण, अतिक्रमण, औद्योगिक वाढ आणि पर्जन्य जलसंचयनाच्या अभावामुळे भूजल पुनर्भरण प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जलसाठ्याचे स्रोत नष्ट झाल्याने पाण्याखालील स्तर घटत आहे. यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचन जलसाठ्याची गंभीर स वाढ झाली आहे. ही वाढ अत्यल्प मानली जात असून, भूजल साठ्यातील स्थिरता धोक्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भूजल पातळी ही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तज्ज्ञांकडून विविध हंगामांमध्ये विहिरींमधील जलस्तर मोजून निश्चित केली जाते. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही हंगामातील जलस्तर नोंदींचे समस्या निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळी

२०२० – ०.४३ मीटर

२०२१ – ०.५५ मीटर

२०२२ – ०.६२ मीटर

२०२३ – ०.५४ मीटर

२०२४ – ०.५४ मीटर

२०२५ – ०.६८ मीटर