सीएसएमटीसह, कल्याण, ठाकुर्ली स्थानकाला प्राधान्य

मुंबई : गेल्या तीन-चार वर्षांपासून ऐतिहासिक ठाणे स्थानक व परिसराचा कायापालट करण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ रंगले असून स्थानकाच्या पुनर्विकासाबाबत अद्याप ठोस निर्णयच झालेला नाही. ‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन’ (आयआरएसडीसी) ठाणे स्थानकाच्या विकासाचे काम करणार आहे. परंतु प्रथम सीएसएमटी, कल्याण, ठाकु र्ली स्थानकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून ठाणे स्थानकाच्या विकासाचा नंतर विचार के ला जाणार असल्याची माहिती कॉपरेरेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे दरम्यान धावली होती. त्यामुळे ठाणे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले  आहे. या ऐतिहासिक ठाणे स्थानकातून मुख्य मार्गावर कल्याण, सीएसएमटीच्या दिशेने लोकल सुटतात, तर ठाणे ते पनवेल अशी ट्रान्स हार्बर सेवाही आहे. त्यामुळे या स्थानकातून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. प्रवासी संख्या वाढल्याने एकच गर्दी होत असते. फलाट, पादचारी पुलांवर गर्दी होतानाच स्थानकातील सर्वच प्रवेशद्वारेही सताड उघडी असतात.     एकूणच वाढलेल्या गर्दीमुळे स्थानकावर ताण पडत असून सुविधांचाही अभावच दिसतो. स्थानकाला ऐतिहासिक वारसा असूनही अद्याप पुरेशा सोयी-सुविधा नसल्याची ओरड रेल्वे प्रवासी संघटनांकडून होत आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रथम ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सीएसएमटी स्थानक व परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानकाचे संवर्धन व जपणूक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय आयआरएसडीसीकडूनही सीएसएमटी स्थानक व परिसरातील मोकळ्या जागांचा प्रवासी व पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन विकास करण्यात येणार आहे. प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा, गॅलरी, कॅफेटेरिया, वाहनतळासाठी जागा अशा अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर या कामासाठी निविदा प्रक्रि या राबविण्यात येत असून या कामासाठी अनेक बडय़ा कं पन्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

याबरोबरच कल्याण व ठाकु र्ली स्थानक व परिसाराचाही विकास करण्याचे काम आयआरएसडीसीने हाती घेतले आहे. यामध्ये निविदा प्रक्रि या राबवली जात असून साधारण दोन महिन्यांत ती खुली के ली जाईल आणि पुढील प्रक्रि येला गती दिली जाणार असल्याची माहिती आयआरएसडीसीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ठाणे स्थानक व परिसराचाही पुनर्विकास करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. साधारण ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम तीन ते चार वर्षांपूर्वी एका बांधकाम कं पनीला देण्यात आले होते. परंतु काही कारणांस्तव या कं पनीकडून हे काम काढून घेण्यात आले. हेच काम आता आयआरएसडीसीकडे सोपवण्यात आले आहे. मात्र ठाणे स्थानकाच्या विकासासाठी सल्लागारची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसून कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही. आधी सीएसएमटी, कल्याण, ठाकु र्लीसह पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांच्या कामांकडे लक्ष कें द्रित के ल्याचे स्पष्ट के ले.

गर्दीचे नियोजन

ठाणे स्थानकाच्या विकासाचे काम हाती घेतल्यास होणारी गर्दी पाहून स्थानकातील प्रवेशद्वार, प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा व प्रवासी सुविधा कशा वाढवता येतील, यावर अधिक भर दिला जाईल. गेल्या काही वर्षांत या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे.

ठाणे स्थानक इमारतीवर हातोडा

ठाणे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर स्थानक व्यवस्थापक कार्यालय, पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय इत्यादी सुविधा आहेत. मध्य रेल्वेने ही इमारत पाडून त्या जागी एकमजली नवीन इमारतीची उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु काही तांत्रिक मुद्दय़ांमुळे या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे स्थानक व परिसराच्या विकासाबाबत चर्चाच सुरू आहे. परंतु अद्याप विकास झालेला नाही. यावर रेल्वेकडून ठोस निर्णय घेतला जाणार आहे की नाही?. या स्थानकाचा लवकरात लवकर विकास करावा.

नंदकु मार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ