ठाणे: कळवा परिसरातील एका इमारतीमधील घराच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून चारजण जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सर्व जखमी व्यक्तींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल होते. या जखमी व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

ठाणे म्हापलिका क्षेत्रात पावसाळ्यात धोकादायक धोकादायक इमारतीच्या प्लास्टरचा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होण्याचे प्रकारे घडतात. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वीच शहरात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या असून मंगळवारी सकाळी कळवा परिसरात अशीच एक घटना घडली आहे.

कळवा येथील खारेगाव परिसरातील कावेरी हाईट्स जवळतनुजा इमारत, प्रेम नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. तनुजा सोसायटीची इमारत तळ ३ मजली असून या इमारतीचे बांधकाम २५ ते ३० वर्ष जुने आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील २०४ या क्रमांकची रूम महेंद्र जगन्नाथ खरात यांच्या मालकीची आहे. या रूमच्या बेडरूम मधील प्लास्टरचा काही भाग मंगळवारी सकाळी पडला.

या घटनेची माहिती मिळताच कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अतिक्रमण विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत घरातील चार व्यक्तींना दुखापत झाली आहे. तसेच, घरातील उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने, सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून संबंधिताना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चारजण जखमी

प्रिया महेंद्र खरात (२४ वर्षे) हिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पियुष खरात (१७ वर्षे) याच्या डाव्या हातात आणि उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. मानव खरात (२१ वर्षे) याच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. सीमा खरात (४५ वर्षे) यांच्या डाव्या हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या सर्व जखमी व्यक्तींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल होते, या जखमी व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.