कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार परवाना विभागाने येथील गफूरडोन चौक भागात सोमवारी दुपारी बनावट तूप आणि लोण्याचा १२५ किलो साठा जप्त केला आहे. भिवंडीतून हा बनावट वस्तूंचा साठा कल्याणमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता. अन्न आणि औषध प्रशासन विभाग, बाजारपेठ पोलिसांना या प्रकरणाची पालिकेने माहिती दिली. याप्रकरणाचा तपास पालिका, पोलिसांनी सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडीतील निजामपुरा भागात राहणारे मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद , तौसिफ इक्बाल काझी (रा. खडकरोड, तीनबत्ती नाका, भिवंडी) अशी बनावट साठा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या इसमांची नावे आहेत. तुपाचे १२५ किलो वजनाचे पाच खोके, ३० किलो वजनाच्या दोन खोक्यांमध्ये लोणी होते. पालिकेच्या बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांना भिवंडीतील काही इसम एका मोटीरमधून बनावट तूप, लोणी कल्याणमधील गफूरडोन चौक भागातील दुकानांमध्ये विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती.

हेही वाचा : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा

मिळालेल्या माहितीप्रमाणे साहाय्यक आयुक्त ठाकुर, बाजार परवाना विभागातील प्रशांत धिवर आणि सहकारी कर्मचारी तातडीने गफूरडोन चौकात दाखल झाले. त्यावेळी एका मोटारीतून एका दुकानात मोटारीतून तूप, लोण्याचे खोके उतरविण्याचे काम सुरू होते. साहाय्यक आयुक्त ठाकुर यांनी या तूप, लोणी खरेदीच्या पावत्या आणि ते कोठुन आणले आहे याची माहिती इसमांकडे मागितली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. इसमांनी कुर्ला येथून लोणी खरेदी केल्याच्या पावत्या दाखविल्या. तूप खरेदीच्या पावत्या ते दाखवू शकले नाहीत.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बाजार परवाना पथकाने तूप, लोणी जप्त केले. याबाबतची माहिती बाजारपेठ पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन विभाग ठाणे यांना देण्यात आली. या वस्तुंची शुध्दता तपासण्यासाठी तूप, लोणीचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. अशाचप्रकारे तूप वाहून नेणारे एक वाहन अन्य भागात गेल्याची माहिती पथकाला मिळाली. पण त्याचा वाहन क्रमांक इतर माहिती वेळीच न मिळाल्याने तो वाहन चालक पळून गेल्याची चर्चा होती.

हेही वाचा : Thane City Vidhan Sabha Constituency : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा आमदार; नवं राजकीय समीकरण कोणाच्या पथ्यावर?

बाजार परवाना विभागाला मिळालेल्या माहितीप्रमाणे गफूरडोन चौकात तूप, लोण्याचा साठा जप्त केला आहे. या वस्तुंची शुध्दता , सत्यता तपासणीसाठी जप्त मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या वस्तुंच्या शुध्दतेबद्दल संशयास्पद अहवाल आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. सणासुदीच्या काळात नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी. – वंदना गुळवे (उपायुक्त, बाजार परवाना विभाग)

भिवंडीतून बनावट तूप, लोण्याचा साठा कल्याणमध्ये विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर बाजार परवाना विभागाच्या पथकाने गफूरडोन चौक भागात लावलेल्या सापळ्यात भिवंडीतील दोन जण अडकले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून येणाऱ्या अहवालाप्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रसाद ठाकुर (साहाय्यक आयुक्त, बाजार परवाना विभाग)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan 125 kg adulterated ghee and butter seized ahead of festivals css