कल्याण – कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका हाॅटेलमध्ये तीन जण १५ हजार रूपये ग्राहकांकडून घेऊन वेश्या व्यवसाय चालवित असल्याच्या माहितीवरून ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून संबंधित हाॅटेलमध्ये छापा टाकून चार पीडित तरुणी, दोन महिलांना अटक केली होती. याप्रकरणातील मुख्य सुत्रधार एक इसम फरार होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमाला आंंबिवली भागातून मंंगळवारी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद फननन मौर्या असे या इसमाचे नाव आहे. कल्याणमधील एका हाॅटेलमध्ये दोन महिलांच्या साथीने वेश्या व्यवसाय चालविणारा विनोद मौर्या मागील महिनाभरापासून फरार होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाचे पथक त्याच्या मागावर होते. याप्रकरणी वेश्या व्यवसाय प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच कल्याण पूर्वेतील वालधुनी भागात राहणारी सुनीता चंद्रकांत गोरे, उल्हानगर पंजाबी काॅलनी भागात राहणाऱ्या सरला आकाश भालेराव यांना अटक केली आहे. या गुन्ह्यानंतर विनोद मौर्या फरार झाला होता. तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता.

विनोद आंबिवली जवळील हनुमान मंदिराजवळील पंडित चाळीत येणार आहे, अशी गुप्त माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या गुन्हे पथकाला मंगळवारी मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, साहाय्यक उपनिरीक्षक श्रध्दा कदम, हवालदार के. बी. पाटील, उदय घाडगे यांंनी आंबिवली भागात सापळा लावला. मौर्याला अटक केली.

गेल्या महिन्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती, की सुनीता, सरला आणि विनोद नावाचे इसम ग्राहकांना सुंदर मुुली शरीरसंबंधांसाठी पुरवितात आणि त्या बदल्यात ते ग्राहकांकडून १५ हजार रूपये घेत आहेत. हा वेश्या व्यवसाय कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे भागात चालविला जात आहे,

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांंनी या प्रकरणाची खात्रीलायक माहिती मिळवली. मार्चमध्ये कल्याणमधील बाजारपेठ हद्दीतील एक कौटुंबिक हाॅटेलमध्ये छापा टाकुन वेश्या व्यवसायाची पोलखोल केली होती. याप्रकरणात पथकाने सुनीता, सरला या ग्राहकांकडून शरीर संबंधांसाठी १५ हजार रूपये घेत असल्याचे पथकाने केलेल्या कारवाईतून उघड झाले होते. याप्रकरणात पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते. ते या तिन्ही वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांच्या संपर्कात होते. सुंदर तरुणी शरीर संबंधांसाठी आम्ही पुरवितो आणि त्या बदल्यात पंधरा हजार रूपये घेतो. ते पैसे सरला किंवा सुरेखा द्यायचे असे विनोद ग्राहकांना सांंगत असे.

कल्याणमध्ये खुलेआम हा वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या त्रिकुटाला हाॅटेल चालकाची साथ होती का. पीडित मुलगी ते कोठुन आणायचे याचा तपास पथक करत आहे. आपल्या या व्यवसायातून चांगला पैसा मिळत असल्याने आणि गरजु मुलींंना पैसे मिळत होते म्हणून आपण हा व्यवसाय चालवित होतो, असे उत्तर हा व्यवसाय चालविणाऱ्या महिलेने पथकाला दिले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan person arrested for running prostitution at ambivli area css