ठाणे : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून गळ्यातील सोनसाखळी खेचून नेणे, बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने काढून घेणे, सोने चोरी होणे असे अनेक प्रकार घडत असतात. यातील काही प्रकरणांचा पोलिसांकडून शोध लागत असतो. त्यानंतर संबंधित तक्रारदाराला गुन्ह्यातील जप्त सोने परत केले जाते. ठाणे पोलिसांच्या कारवाईत पोलिसांना आरोपींकडून सोने हस्तगत करण्यात यश आले. परंतु या सोन्याच्या मालकांचा शोध लागत नसल्याने हे सोने पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात पडून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नव्या वर्षात फेब्रुवारीअखेर ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार, पीएम ई बस योजनेतून शंभर विद्युत बसगाड्या उपलब्ध होणार

ठाण्यात अनेकदा दुचाकीवर आलेल्या चोरट्यांकडून सोनसाखळी खेचली जाते. तसेच काही भामट्यांकडून नागरिकांना रस्त्यात अडवून बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोने काढून घेतले जाते. चोरीची देखील अनेक प्रकरणे समोर येत असतात. ज्या व्यक्तीचे सोने चोरीला जाते. त्याच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जात असते. तक्रार दाखल करताना संबंधित व्यक्तीचा निवासी पत्ता देखील दिला जात असतो. ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांपैकी काही प्रकरणात आरोपींचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले आहे. या दाखल प्रकरणात आरोपींकडून सोन्याचा ऐवज जप्त करून तो संबंधित मालकाला संपर्क साधून परत केला जात असतो. ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचा ऐवज पोलिसांनी परत करण्यास सुरूवात केली आहे. परंतु अनेक प्रकरणात तक्रारदारांचा शोधच लागत नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : कल्याणमधील वालधुनी नदीजवळ उड्डाण पूल; ६३९ कोटींचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ला सादर

अन्यथा सोने होईल सरकारजमा

हा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बऱ्याच कालावधीपासून पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा आहे. या प्रकरणातील तक्रारदार त्यांच्या पत्त्यावर ते आढळून आले नाहीत. तरी संबंधित तक्रारदारांनी प्रथम खबरी अहवालाची प्रत (एफआयआर), आधार कार्ड या कागदपत्रांसह तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा हा मुद्देमाल सरकार जमा करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार कोण आहेत

  • विजय दगडू मिटकर, रा. कोपरा, भिवंडी आणि रवि जयकिशोर ढकोलीया, रा. मोतीराम शेळके चाळ, कोलशेत, ठाणे.- सोन्याचा ऐवज – वजन -९.४२० ग्रॅम. आणि ३५.३२० ग्रॅम.
  • सुरेश बापू(दादु) डीके, रा. आझादनगर, मानपाडा, कोलशेत रोड, ठाणे आणि दलविंदरकौर संतोसिंग परमार, रा. कोकण भवन, सीबीडी, नवी मुंबई.- सोन्याचा ऐवज- वजन- ५ ग्रॅम. आणि ३ ग्रॅम.
  • भरत दामोदर थोरात, रा. त्रिपाठी चाळ, आझादनगर-1, ठाणे. – सोन्याचे ऐवज- एक कोल्हापूरी साज.
  • अब्दुलनारी अब्दुलकरीम सोदागर, रा. शिवाजीनगर, राबोडी, ठाणे. सोन्याचे ऐवज- वजन – १५ ग्रॅम.
  • पार्वतीबाई वराराम वाघरी, आणि भटू वाघरी, मुलुंड – चांदीच्या दोन अंगठ्या.
  • अंकेश इंदरमल जैन, लोक उपवन, 3 सोन्याच्या अंगठ्या.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane police found the stolen gold but could not trace the owners of the gold css