ठाणे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले आहे. अभिजीत पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार करण्यात आल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सातजणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. असे असताना ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती.

हेही वाचा – ‘सीआयएससी’ निकालात मुंबई-ठाण्याची बाजी, प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांत तीन मुलींचा समावेश 

मार्चमध्ये ठाणे पोलिसांनी चौघांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तुम्हाला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार का केले जाऊ नये असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यावर चौघांनी उत्तरासाठी मुदत मागितली होती. अखेर रविवारी ठाणे पोलिसांनी अभिजीत पवार यांना तडीपार केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad personal assistant has been banished ssb