ठाणे – शिक्षणासाठी कोणतेही वय नसते असे म्हटले जाते. दरम्यान, हेच वाक्य मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात वास्तव्यात आणण्यात आले आहे. मुरबाडमधील फांगणे गावात ६० ते ९७ वय असणाऱ्या आजीबाई मागील ९ वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. ‘आम्हाला लिहता वाचता येत असते तर, शिवजयंतीच्या आनंदोत्सवात आम्हीही सहभागी झालो असतो’ अशी खंत काही वर्षांपुर्वी आजींनी व्यक्त केली होती. यातूनच ‘आजीबाईंची शाळा’ या अनोख्या उपक्रमास सुरूवात होऊन आजपर्यंत हा उपक्रम राबविला जात आहे.
शिक्षण ही मानवाच्या मुलभूत गरजांपैकी एक गरज मानली जाते. शिक्षणाला कोणतीही वयोमर्यादा नसते. मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सुरू होता. त्यावेळी १०० महिला शिवरायाच्या चरित्राचे पठण करित होता. मात्र, यावेळी याच गावातील काही आजी पुढे येत ‘आम्हालाही लिहता वाचता येत असते तर, शिवरायांच्या आनंदोत्सवात आम्ही देखिल सहभागी झालो असतो. परंतू लिहता वाचता येत नसल्याने सहभागी होणे शक्य नाही’, अशी खंत आजींनी व्यक्त केली. त्यानंतर आजींच्या शिक्षणयज्ञास सुरूवात झाली. ८ मार्च २०१६ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला.
सुरूवातीला आजींना बाराखडी, मुळाक्षरे शिकवण्यात आली. त्यानंतर शब्द, वाक्य असे टप्प्या टप्प्याने शिक्षण दिले गेले. फळा, पाटीवर मोठ्या अक्षरात मुळाक्षरे लिहण्यात आली होती. फांगणे गावातील एका घरात या शाळेला सुरूवात झाली. त्यानंतर २ ते ३ वर्षांनी गावातील प्रकाश लक्ष्मण मोरे यांच्या जागेत पर्यावरणस्नेही झोपडी उभारून त्यात आजीबाईंची शाळा भरू लागली. या शाळेत फांगणे गावातील ३० आजी बाई शिक्षण घेत आहेत. आजीबाईंच्या शाळेची संकल्पना या शाळेचे व्यवस्थापक योगेंद्र बांगर यांनी मांडली. शिक्षिका शितल प्रकाश मोरे या आजीबाईंना शिक्षण देतात. कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था या शाळेचे काम पाहते. या संस्थेचे अध्यक्ष दिलीप दलाल हे आजीबाईंच्या शिक्षणाची जबाबदारी पाहत आहेत.
ठाणे – शिक्षणासाठी कोणतेही वय नसते असे म्हटले जाते. दरम्यान, हेच वाक्य मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात वास्तव्यात आणण्यात आले आहे. मुरबाडमधील फांगणे गावात ६० ते ९७ वय असणाऱ्या आजीबाई मागील ९ वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. ‘आजीबाईंची शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे. (व्हिडीओ क्रेडिट… pic.twitter.com/ud3sOC7MMr
— LoksattaLive (@LoksattaLive) November 12, 2025
निरक्षरांना शिक्षणाचा आधार
निरक्षर महिलांना शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये मध्यंतरी एक हजार महिलांसोबत स्वाक्षरी शिकवण्याचे कार्य पार पडले. आता, यामध्ये कातकरी महिलांसाठी ‘आईची शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम मुरबाडमधील काही गावात येथे घेतला जातो.
९७ वर्षाची आजीचा सहभाग
फांगणे गावातील आजीबाईंच्या शाळेत ३० आजी शिक्षण घेत आहे. काही आजी कालवश झाल्यास त्यांच्या जागी इतर आजी सहभागी होतात.शाळेत सध्या ९७ वर्षांची हौसा केदार आजी शिक्षण घेत आहे.
आजीबाईंचा क्रीडा महोत्सव
आजीबाईंच्या शाळेत शिक्षणासोबतच क्रीडा महोत्सव घेतला जातो. त्यात आजी कबड्डी, खो-खो सारखे खेळ खेळतात. हस्तकला, चित्रकला,रांगोळी
