सरकार आणि पोलिसांच्या विरोधात शनिवारी भाजपाकडून कल्याण-डोंबिवलीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत एक हजार भाजपा कार्यकर्त्यांना नोटीस बाजावल्याने हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती माजी राज्यमंत्री आणि भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> Photos: आदिवासी पाड्यातील व्हायरल फोटोची दखल घेत आदित्य ठाकरे थेट नाशिकमध्ये पोहचतात तेव्हा…

मागील काही दिवसात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी. नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्य खांद्यावर घेतले असून अनेक नगरसेवक शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांना, तुल्यबळ नगरसेवकांना धमकावत त्यांना पक्षांतर करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

भाजपाच्या मनोज राय, सचिन खेमा आणि अपक्ष भाजपा समर्थक कुणाल पाटील या तीन नगरसेवका विरोधात खंडणी, धमक्या, जबरदस्तीने जागा बळकावण्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून यानंतर या नगरसेवकाची पाठराखण करताना भाजपाने सत्तेचा वापर करत राज्य सरकार या नगरसेवकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा आरोप केलाय.

नक्की वाचा >> Shark Tank India ची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल; नाशिकमधील मराठमोळ्या स्टार्टअपला दिली ‘ही’ ऑफर

याचविरोधात भाजपाने मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भाजपा शनिवारी अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या मोर्चासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र या मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना नोटीस देत मोर्चा काढून करोना नियमावलीचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यानंतर भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी मोर्चा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.

नक्की वाचा >> “संजय राऊत शपथ देत नाहीत मुख्यमंत्र्यांना, ती राज्यपालांनाच द्यावी लागते”

कार्यकर्त्यांना अडचणीत आणणे योग्य नसल्याने हा मोर्चा रद्द करत आहोत. जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा मोर्चा काढला जाईल असं चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. भाजपाच्या एक हजार कार्यकर्त्यांना आतापर्यत नोटीस पाठवण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र याचवेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात असून हे सहन केले जाणार नस्ल्याचा इशाराही दिलाय. कार्यकर्त्यांवर अन्याय होत राहिला तर टोकाचा संघर्ष केला जाईल असा इशाराही माजी राज्यमंत्र्यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali bjp protest cancelled as police sent notice to 1000 party workers scsg
First published on: 28-01-2022 at 21:03 IST