ठाणे – कल्याण तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबईत पालिकेत समावेश करणाऱ्याला गणेश नाईकांचा तीव्र विरोध आहे. याच विषयावर पुन्हा एकदा नाईकांनी टिका करत कोणाच्या तरी लहरीपणामुळे १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आला. मात्र, लहरीपणातून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज नवी मुंबई जनतेवर टाकू देणार नाही. निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गाव बाहेर काढू. ही गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुर्ण पुण्याई कामाला लावेल असा थेट इशारा नाईकांनी दिला. नवी मुंबईतील १०० सेवाभावी उपक्रमाच्या सुवर्ण गौरव महोत्सवावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य सरकारने कल्याण तालुक्यातील दहिसर, नावळी,निगू, मोकाशी पाडा, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. भौगोलिकदृष्ट्या ही गावे ठाणे महापालिका हद्दीला लागून आहेत. नवी मुंबई आणि या गावांमध्ये एक अख्खा डोंगर येतो. असे असले तरी लोकसभा निवडणुकीतील मतांचे गणित लक्षात घेता या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला. सुरुवातीच्या काळात ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत होती. मात्र, वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून या गावांमध्ये महापालिका नको असे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती.

मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत नागरी सुविधांअभावी या गावात महापालिकेशिवाय विकास होत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांच्या मागणीनंतर लोकसभेच्या काळात या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात आला. या मुद्द्यावरून नाईकांचा विरोध कायम होता. याच मुद्द्यावर बोलत असताना नाईकांनी आम्ही जो निराधायक भावनेतून या गावांना स्वीकारले होते. परंतु याच्यानंतर ती लादण्याची गरज नव्हती. त्यावेळी मी आमदार होतो या निर्णयाबाबत मला विचारलं हवे होते असे देखील नाईक म्हणाले. १४ गावे नवी मुंबईत घ्यावी हा ठराव मी पालिकेमध्ये सादर केला होता. अटी शर्तींनुसार मंजूरही केला होता. तेथे असलेल्या डोंगराला बोगदा काढा त्यासाठी ५०० कोटींची मागणी केली होती. मात्र, आता त्या बोगद्यासाठी ६ हजार कोटीं देण्यात आले.

निवडणुकीच्या सहा महिन्यांनी गाव बाहेर निघणार ?

मुख्यमंत्र्यांकडे मलाही १४ गाव आमच्यात नको असे सांगितले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गाव आपण बाहेर काढू. ही गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुर्ण पुण्याई कामाला लावेल असा थेट इशारा नाईकांनी दिला. ती लोक देखील आमचीच आहेत. परंतु कोणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी मुंबई जनतेवर का आम्ही टाकू असा स्पष्ट प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्या गावांच्या आता विकास करायचा असेल तर ६ हजार कोटी रूपये आहे. दरवर्षी यात आणखी वाढ होईल. भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे भार महापालिकेवर आला तर परिस्थिती भयानक असेल. या पाच वर्षांमध्ये कोणाच्या तरी लहरीपणामुळे नवी मुंबईतल्या एफडीची वाट लावून टाकली. ज्या प्रभागामध्ये ५० लाख रुपयांची गरज नव्हती त्या ठिकाणी पाच कोटी रुपये खर्च केले. ४० कोटी रुपयांचे काँक्रिट रस्ते तयार केले गेले. एका ठिकाणी दोन लाख रुपयांनी एका ठिकाणी २० कोटी. अशा प्रकारचे लहरीप्रमाणे काम केले. गणेश नाईकला पचत नाही अस नसून गणेश नाईकला पटत नाही असे देखिल नाईक यावेळी म्हणाले.

नवी मुंबईच्या जनतेने सावध राहा

गणेश नाईक प्रत्येकाचा मान सन्मान, पदाप्रमाणे जनतेचा हिताकरता कुठल्याही टोकाला जाऊ. यामध्ये कोणतीही हिंसा करणार नाही. आम्ही आमच्या मनाला क्लेष करून जनसामान्यांचा भावना मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. नवी मुंबईच्या जनतेने सावध राहा असा सल्ला देखील नाईकांनी यावेळी दिला.