डोंबिवली : येथील पूर्व भागातील फडके रस्त्यावर चप्पल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याला एका व्यक्तीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. ‘चोरा’ अशी हाक मारल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सुनील भागीरथ मंडराई (४५)  असे तक्रारदाराचे नाव आहे. ते सावरकर रस्त्यावरील रोहिदास चाळ भागात राहतात. मुकेश नमने (३५) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार सुनील मंडराई यांचा डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली शहरे खड्ड्यात, अभियंत्यांचे मात्र विदेशी पर्यटन

सोमवारी सायंकाळी सुनील हे चप्पल विक्रीसाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या समोरील रस्त्यावरुन आरोपी मुकेश नमने चालला होता. त्याला पाहून सुनील यांनी ‘ये चोरा’, अशी हाक मारली. त्याचा राग आल्याने मुकेशने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुनीलच्या पायाचे हाड तुटले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुनीलने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पी. के. हासगुळे हे याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man brutally beaten up footwear trader in dombivli zws