ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना ते आव्हाड यांचे अंगरक्षक होते. त्यावेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव कदम हे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेवर आले. त्यावेळी त्यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहीली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आव्हाड हे मंत्री असताना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या मारहाणीप्रकरणात कदम यांना अटक झाली होती. त्यानंतर ते जामीनावर सुटले होते. कदम हे सध्या मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून एसपीयु शाखेत कार्यरत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jitendra awhad former bodyguard committed suicide he was arrested in the anant karmuse case asj
First published on: 29-03-2023 at 14:15 IST