लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर काही दिवसांनी सीबीआयचे एक पथक दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात आले. त्या पथकाने आनंद आश्रमाची झाडाझडती सुरू केली. त्यांनी दिघे साहेबांना आश्रमातील लॉकर उघडण्यास सांगितले. लॉकर उघडले असता, त्यामध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा, हळद, कुंकु सापडले. त्यानंतर त्या पथकाला निघून जावे लागले असा किस्सा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेनेचे माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन संपर्क प्रमुख सतीश प्रधान यांच्या ठाण्यातील राहत्या घरी भेट घेतली. प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान ओळखल्या जाणाऱ्या आयोध्या नगरीत श्रीराम मंदिर उभे रहावे हे समस्त हिंदू बांधवांचे स्वप्न होते. आज खऱ्या अर्थाने तेथे राम मंदिर उभे राहत आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली होती. त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे ४ डिसेंबरला हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांच्या आदेशानुसार अयोध्या मध्ये शिवसेना नेते माजी खासदार सतीश प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना यावेळी प्रतिकात्मक कारसेवा न करता शिवसैनिक आपल्या पद्धतीने कारसेवा करणार आहेत असे सांगितले होते. त्यावेळी त्याची जबाबदारी सतीश प्रधान व संभाजीनगरचे तत्त्कालीन शिवसेना खासदार मोरेश्वर सावे, तसेच उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे तत्त्कालीन आमदार पवनकुमार पांडे यांच्यावर होती.

आणखी वाचा-ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रज्वलित केली १११ फूट अगरबत्ती

त्यानंतर बाबरी मशीद प्रकरणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, पवनकुमार पांडे व असंख्य शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसानंतर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रमात सीबीआयचे पथक दाखल झाले. आनंद आश्रमची झडती घेतली. तसेच दिघे साहेबांना आनंद आश्रमातील लॉकर उघडण्यास सांगितले. लॉकर उघडले असता, त्यामध्ये केवळ देवी देवतांच्या प्रतिमा, हळदी-कुंकू सापडल्यानंतर पथक तिथून निघून गेले असा किस्सा खासदार राजन विचारे यांनी सांगितला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp rajan vikhare told the story of the demolition of babri masjid and cbi raid on anand dighes ashram mrj
First published on: 22-01-2024 at 15:39 IST