अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीतील प्रकार; ५ जणांवर गुन्हा दाखल
अंबरनाथ : राज्यात बैलगाडी शर्यतींना बंदी असताना अंबरनाथमध्ये चक्क शहरी पट्टय़ात बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. कल्याण, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात या शर्यतींचे आयोजन केले जात असल्याचे दिसून आले होते. मात्र रविवारी अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर येथील औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत या शर्यतींचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पारस कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात रविवार, ३ जानेवारी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. मुंबई पोलिसांनी एक संपर्क कक्ष तयार केले आहे. या कक्षाद्वारे पोलीस कर्मचारी थकीत दंड असलेल्या वाहनचालकांना मोबाइलवर संपर्क साधून थकीत दंड भरण्याचे आवाहन करत आहेत. मुंबई पोलिसांनी डिसेंबर महिन्यात १ कोटी २२ लाख २२ हजार २५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. ठाणे वाहतूक शाखेकडे अशी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नसताना नियम मोडणाऱ्या चालकांना रस्त्यावर अटकाव करून त्यांच्याकडून जुन्या आणि नव्या दंडाची कारवाई करत आहे. ठाणे पोलिसांनी ३ कोटी २३ लाख ९४ हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली.
जानेवारीपासून शर्यतींचा हंगाम
गेल्या वर्षांत अंबरनाथच्या ग्रामीण भागातील करवले येथील शिवारात मोकळ्या जागेत ३ जानेवारी रोजी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या, तर ३० जानेवारी रोजी काकडवाल शिवारात शर्यती रंगल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी छापा मारून छोटी बैलगाडी ताब्यात घेतली होती. तर २०१९ मध्ये मार्च महिन्यात होळीच्या दिवशी उसाटणे येथे शर्यती रंगल्या होत्या. त्यापूर्वी बदलापूरजवळच्या गावांमध्ये शर्यतींमध्ये शाब्दिक चकमकीतून गोळीबारही झाला होता. मात्र एकूण शर्यतींपैकी अवघे २० ते ३० टक्के प्रकरणे उजेडात येऊन त्यावर कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे.
