लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर: भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडकी. तपन बिस्वास( ४६)असे या मयत खेळाडूचे नाव आहे

फुटबॉलची आवड असल्यामुळे तपन एका फॉटबॉल क्लब मध्ये जोडलेला होता. गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील सुभाष चंद्र बोस मैदानात फुटबॉल खेळत असताना त्याला अचानक थकवा जाणवू लागला. त्यामुळे छातीत आणि पायात दुखत असल्याचे सांगत तो मैदानाबाहेर जाऊन बसला. काही वेळ बसल्यानंतर अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

इतर खेळाडूंनी हे पाहताच त्याला तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मागील महिन्यात देखील वसईत ईनोसंट रिबेलो (२७) या तरुणाचा फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Player dies of a heart attack while playing mrj